PM मोदी व्हाया मेट्रो दिल्ली विद्यापीठात पोहोचले; पाहा प्रवासातील खास क्षणचित्रे | पुढारी

PM मोदी व्हाया मेट्रो दिल्ली विद्यापीठात पोहोचले; पाहा प्रवासातील खास क्षणचित्रे

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi : दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधानांचा ताफा बाय रोडच जाणार होता. मात्र, अचानक यामध्ये बदल करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांप्रमाणे मेट्रोच्या वन कार्डने प्रवेश केला. नंतर मेट्रोतून प्रवास केला. त्यांच्या या प्रवासाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांसोबत संवादही साधला.

दिल्ली विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1 मे 1922 रोजी दिल्ली विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. शताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठात खास समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाची आज सांगता होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहे.

PM Modi : ‘गळ्यात आकर्षक गमछा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाची अनेक वेळा चर्चा होत असते. यावेळीही त्यांच्या गळ्यातील क्रीम पांढरा आणि हलक्या लाल छटेची डिझाईन असलेला गमछा सर्वांचेच लक्ष वेधत होता. यावेळी नेहमीप्रमाणेच त्यांनी कुर्ता पायजमा त्यावर काळ्या पांढऱ्या चेक्सचा आकर्षक जॅकेट परिधान केला होता. यावर त्यांच्या गळ्यातील गमछा लक्ष वेधून घेत होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या मेट्रोच्या प्रवासात सर्वसामान्य नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मेट्रोतील प्रवासी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे दिसून येत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोत उपस्थित प्रवाशांसोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. त्यांच्याशी संवाद साधला.

 

 

 

PM Modi in DU Via Metro 1

Special Olympics World Games Berlin 2023 : बर्लिन ‘स्पेशल’ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे PM मोदींकडून कौतुक

PM Modi Egypt Visit : पंतप्रधान मोदींचा इजिप्तच्‍या सर्वोच्च पुरस्काराने सन्‍मान

Back to top button