खराळवाडी : महापालिकेने शुक्रवारी (दि. 21) रोजी खराळवाडी, गांधीनगर भागात पाणीपुरवठा वेळेवर केला नाही. दुपारी सर्व नागरिक जिकडे तिकडे कामावर निघून गेल्यावर ऐन दुपारी बारा वाजता पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली.
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पिंपरी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाने कोणत्याही प्रकारची सूचना न देता शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा ठरलेल्या वेळेत करणे सहाजिक होते, परंतु वेळेचे नियोजन बिघाडामुळे गांधीनगर येथील स्थानिक नागरिकांवर ऐन महापालिकेच्या निवडणुकी तोंडावर पाण्यासाठी सैरावैरा धावण्याची वेळ आली.
खराळवाडी, गांधीनगर परिसरात रोज पहाटे पाच वाजता पाणीपुरवठा केला जातो. मात्र शुक्रवारी विलंब झाल्याने नागरिकांना जवळच्या एच ए सोसायटी, विठ्ठल रखुमाई मंदिर, महिंद्रा मॉल, इथून बोरिंगचे पाणी आनले. काही नागरिकांनी पाच जणांचा ग््रुाप करून टँकरद्वारे पाणीपुरवठा खेरेदी केला. नंतर बारा वाजता पाणीपुरवठा विभागाने नळाद्वारे पाणीपुरवठा केला. तो पर्यंत पाणी सुटण्याची वेळ निघून गेल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. खराळवाडी, गांधीनगर भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आहे. तो सकाळीच कामावर जात असल्याने अवेळी आलेले पाणी त्यांना घेता आले नाही. परिणामी पाण्यासाठी पायपीट करावी लागली.
नवी सांगवी : सांगवीतील अनियोजित पाणीपुरवठ्यामुळे गेली दोन दिवस नागरिक त्रस्त आहेत. पालिकेकडून निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्ती गुरुवारी (दि. 20) करण्यात आली. यादरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला नाही. दुरुस्तीनंतर शुक्रवारी आणि शनिवारी पाणीपुरवठा विस्कळित झाला. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत काही भागात पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परिणामी परिसरात पाणीबाणीचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क केला असता काही वेळातच पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा केला तो अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे अनेकांच्या पाण्याच्या टाक्या न भरल्याने गैरसोय झाली. पाण्यासाठी नागरिकांना तसेच महिलावर्गाला वणवण करण्याची वेळ आली. परिणामी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःहून काही भागात गरजूंना खासगी टँकर, पाण्याचे जार उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा न झाल्याने सांगवी येथील जलतरण तलावाला याचा चांगलाच फटका बसला. फिल्टर मशीनच्या टाक्या खाली झाल्याने फिल्टरेशन मशीन बंद ठेवावी लागली. परिणामी जलतरण तलावातील पाणी खराब होत गेले. यामुळे जलतरण तलावात पोहोण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. कधी पहाटे चार वाजता पाणी सोडले जाते. तर कधी पाच वाजता पाणी सोडले जाते. त्यामुळे अचानक सोडलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नळाद्वारे पाण्याचा उपद्रव होतो.स्थानिक
निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर मुख्य पाण्याच्या टाक्या भरण्यास वेळ लागला. काही परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने टाक्या पूर्णतः भरल्या नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी पाणी वेळेत आले नाही. मेन्टेन ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीनंतर दोन दिवस पाणीपुरवठा नियोजनात विलंब होत असतो.अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग