Arrest Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Vehicle Theft: सराईत वाहन चोर अटकेत; 11 दुचाकी जप्त, 9 गुन्ह्यांचा उलगडा

संत तुकाराम नगर पोलिसांची कारवाई; पिंपरी-चिंचवड व पुण्यातील चोरी प्रकरणे उघड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: संत तुकाराम नगर पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 95 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे संत तुकाराम नगर, सहकारनगर, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी, सांगवी, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. संतोष शिवराम घारे (44, रा. ओझर्डे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीची माहिती घेत संतोष घारे याला कामशेत येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांमध्ये एकूण 11 दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी पाच लाख 95 हजार रुपये किमतीच्या या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील वाहन चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर दोन दुचाकींच्या मालकांचा पोलिस शोध घेत आहेत.

...यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलिस शिपाई दत्तू पाटेकर, अनिल मोहिते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष रजपूत, सुनील धावारे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT