Vaishnavi Hagawane case Update
पिंपरी: वैष्णवीबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आनंद कस्पटे यांच्या कुटुंबाला दूरध्वनीद्वारे धीर दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी वाकड येथील कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कस्पटे कुटुंबीयांचा उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.
ठाकरे यांनी आश्वासन दिले की, पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संपूर्ण शिवसेना तुमच्यासोबत आहे. विधानमंडळात आवाज उठवू, अशी ग्वाही दिली.(Latest Pune News)
वैष्णवी हगवणे यांना अतिशय जबर मारहाण केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही सुसाईड केस नसून हत्याच आहे. या प्रकरणातील
आरोपींना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांना अटक करण्यास उशीर झाला. मात्र, आता कोणावर दोषारोप आणि राजकारण न करता वैष्णवीला न्याय देण्यासाठी शिवसेना पक्ष सभागृहात आणि बाहेर प्रयत्न करणार आहे.- सचिन अहिर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)