Ajit Pawar| हगवणे प्रकरणात कोणाचीही गय नाही: अजित पवार

Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Case: गुन्हेगार कोणीही असो, कठोर शासन होणारच. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाणार असून, तातडीने शिक्षा होईल
Ajit Pawar
हगवणे प्रकरणात कोणाचीही गय नाही: अजित पवारFile Photo
Published on
Updated on

Vaishnavi Hagawane Case Update

पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी वाकड येथे कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही.

गुन्हेगार कोणीही असो, कठोर शासन होणारच. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाणार असून, तातडीने शिक्षा होईल, यासाठी सरकारतर्फे पूर्ण प्रयत्न केले जातील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. (Latest Pune News)

Ajit Pawar
Pune: किडनी रॅकेटमध्ये ससूनचे डॉ. अजय तावरे सहआरोपी; रुबी हॉल रुग्णालयात घडला होता प्रकार

अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांना मी स्पष्ट आदेश दिले होते. आरोपींना तातडीने अटक करा. कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. तिघा आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून, सासर्‍याला आणि दिराला शुक्रवारी अटक झाली, असे त्यांनी सांगितले.

पवार यांनी तपास अधिकार्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधून केसशी संबंधित सर्व माहितीचा आढावा घेतला. तपास करणार्‍या पथकाला अधिक माहिती मिळाल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या.

नीलेश चव्हाणचा पाय खोलात

वैष्णवीचे बाळ नीलेश चव्हाणकडे असल्याची माहिती आल्यानंतर त्याच्यावरही कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत राहणार्‍या नीलेश चव्हाणकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या शस्त्र परवान्याची आणि हलचालींचीही चौकशी करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पोलिस दलाचे कौतुक

राजेंद्र व सुशील हगवणे हे सतत गाड्या आणि मोबाईल लोकेशन बदलून पोलिस तपासापासून बचाव करीत होते. मात्र, पोलिसांनी चिकाटीने काम करीत त्यांना अटक केली. केस मजबूत ठेवण्यासाठी सर्व संबंधित कलमांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Rain Alert: संपूर्ण राज्याला उद्या ‘रेड अलर्ट’; 27 मेपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा

मयूरी हगवणे प्रकरणाचाही होणार समावेश

अजित पवार यांनी सूचित केले की, वैष्णवीप्रमाणेच तिची जाऊ मयूरी हगवणे हिचाही छळ झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांतील माहिती एकत्र करून केस अधिक मजबूत केली जाणार आहे.

पोलिस अधिकारीही रडारवर

प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबतही तपास केला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. तुमच्याबाबत दबक्या आवाजात बोललं जातंय. पण, फोनचे कनेक्शन आढळले, तर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा त्यांनी या वेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news