Pune: किडनी रॅकेटमध्ये ससूनचे डॉ. अजय तावरे सहआरोपी; रुबी हॉल रुग्णालयात घडला होता प्रकार

डॉक्टर, एजंटसह तब्बल 15 जणांवर झाला होता गुन्हा दाखल
Sassoon hospital
किडनी रॅकेटमध्ये ससूनचे डॉ. अजय तावरे सहआरोपी; रुबी हॉल रुग्णालयात घडला होता प्रकारFile Photo
Published on
Updated on

पुणे: रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

त्याला आता या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या तावरे पोर्शे कार प्रकरणात मागील वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. (Latest Pune News)

Sassoon hospital
Pune Weather: मे महिन्यात मुसळधार पावसाने शहराचा पारा 26.6 अंशावर

अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. लवकरच गुन्हे शाखा तावरेचा ताबा किडनी रॅकेटमध्ये घेणार आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या रॅकेट प्रकरणात नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितेने तेव्हा डॉ. तावरे याचा सहभाग निश्चित केला होता, तसा अहवालही सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताना तो रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ज्ञ, दलाल, रुग्ण आणि दात्यावर दाखल झाला.

रॅकेटमध्ये होते तब्बल पंधरा आरोपी

किडनी रॅकेटप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उपसंचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती.

असा सापडला डॉ. तावरे जाळ्यात्र-

किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे हा एफआरआयमधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान जुन्या गुन्ह्यांचे निर्गतीकरण करताना पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल वाचनात आला.

Sassoon hospital
Rain Alert: संपूर्ण राज्याला उद्या ‘रेड अलर्ट’; 27 मेपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा

त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला, तेव्हा डॉ. तावरे याचीच प्रत्यारोपणात मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले.

रिजनल अ‍ॅथोरायझेशन कमिटीचा अध्यक्ष होता तावरे-

तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत, हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. रिजनल अ‍ॅथोरायझेशन कमिटीचा तावरे अध्यक्ष होता.

आठ सदस्यांची समिती तावरेच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडनी रॅकेट राज्यात गाजले, तेव्हा ससूनच्या या समितीबाबतदेखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली दहा लोकांची समिती स्थापित केली होती. त्या समितीने केलेल्या चौकशीत तावरेंचा हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा आला प्रकार उजेडात

यादरम्यान संबंधित रुग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पिटलमध्ये तिची विचारपूस करण्यासाठी येत-जात होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का, अशी विचारणा केली.

त्यावर रवीभाऊने केवळ 4 लाख रुपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाइकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर खरे प्रकरण उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news