तळेगाव-स्टेशन : तळेगाव चाकण महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक समस्या गंभीर होत आहेत यामुळे अनेक वेळा अपघात होवून जीवीत हानी झालेली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहन चालकांना आणि नागरीकांना फारच त्रासदायक होत असून वेळही विनाकारण वाया जात आहे. वडगाव (चाकण) फाटा-येथून तळेगाव-चाकण महामार्गावर सोडण्यात येणारी अवजड वाहने प्रवेश बंदीच्या वेळेत नियम धाब्यावर बसवून सोडली जात आहेत.
याबाबत दखल घ्यावी तळेगाव-चाकण महामार्गावर अनेक भाजी विक्रेते बसलेले असतात खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्याच्या काही भागात लावली जातात, याबाबत दखल घ्यावी. काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर कारवाई करावी.तळेगाव चाकण रोडजवळ अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग करण्यात येत आहे, तरी नो पार्किंगचे फलक लावण्यात यावेत.
हॉटेल मॉलच्या बाहेर अनाधिकृतपणे वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे अशा आशयाचे निवेदन सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश लोंढे यांना तळेगाव दाभाडे स्टेशन येथील कार्यालयात नुकतेच देण्यात आले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मिरा फल्ले,माजी नगरसेवक अरुण माने,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत, नितीन जांभळे,प्रा.नितीन फाकटकर,आदी उपस्थित होते.