जगन्नाथ काळे
तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे येथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे.ही समस्या सोडविणेसाठी प्रशासन अपयशी ठरत आहे. तळेगाव स्टेशन भागातील रेल्वे लोहमार्गावरील पूल अरुंद आहे.
त्या पुलाचे शेजारीच जो जूना पूल धोकादायक असल्यामुळे अनेक वर्षांपासून बंद आहे त्या पुलाची दुरुस्ती करुन वापरात आणावा आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने त्या पुलावरुन सोडावीत आणि मुंबईच्या दिशेने येणारी सध्याच्या पूलावरुन सोडावीत म्हणजे तेथे वाहतूक कोंडीस थोडाफार आळा बसेल. (Latest Pimpri News)
तसेच तळेगाव रेल्वे स्टेशन कडे स्टेशन चौकातून जाणारे आणि यशवंत नगर कडून स्टेशन कडे जाणारे रस्ते अरुंद असून रोडवर खड्डे आहेत, रिक्षा स्टँड नाही यामुळे स्टेशन चौकात आणि जनरल हॉस्पिटल गेट समोर वाहतूक तुंबते. यामुळेही वाहतूक कोंडी होते. पुणे येथून लोणावळ्याकडे जाणाऱ्या आणि लोणावळ्याकडून पुणेकडे जाणाऱ्या तसेच पुणे-तळेगाव -पुणे अशा सुमारे ३६ लोकल फेऱ्यांची ये-जा चालू असते तसेच अनेक लांब पल्यांच्या रेल्वेचा थांबा तळेगाव स्टेशन येथे आहे.
आणि या रेल्वे आणि रेल्वे लोकल मधून प्रवाशी तळेगाव स्टेशन येथे उतरणे आणि बसणे सतत चालु असते प्रवाशांना सोडायला आणि न्यायला येणारी वाहने, पादचारी यामुळे अरुंद रस्ता यामुळे रोडवर वर्दळ होते यामुळे आणखी अडचणी येतात यामुळेही वाहतूक कोंडी होते स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर फुटपाथ असणे, रिक्षा स्टँड असणे आवश्यक आहे.तसेच या रोडवरील अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे.
लोकल मधून प्रवाशी उतरतात आणि लोकलमध्ये बसतात त्यांची वाहने ये-जा करणारी वाहने त्यात अरुंद रस्ते त्यावरील खड्डे ,पादचा-यांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत,तसेच तळेगाव-चाकण रोडवर भाजी वाल्यांची,फळविक्रेत्यांची अतिक्रमणे आहेत भाजी,फळे खरेदी करणा-यांची वाहने रोडवरच कडेला लावली जातात यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. कधी कधी वाहतूक कोंडी एवढी असते की काही वाहणे रस्त्याच्या खाली उतरावी लागतात. या बाबींचा प्रशासनाने विचार करावा. अशी वाहन चालकांची आणि नागरिकांची मागणी आहे.https://www.youtube.com/watch?v=te2LrlxMVZg
तळेगाव-चाकण महामार्गावर नगर,नाशिक,बीड,संभाजी नगर आदी भागातून मुंबईच्या दिशेने जाणारी-येणारी वाहने मोठ्या प्रमाणात असतात.तरी तळेगाव मधील वाहतूक कोंडी सोडविणे आवश्यक आहे.चंद्रकांत सावंत सामाजिक कार्यकर्ते.तळेगाव.
कर्मचाऱ्यांची कामाची ड्युटी ८ तासांची असते परंतु वाहतूक कोंडीमुळे घरातून निघून परत येईपर्यंत १५तास लागतात यामुळे मनस्ताप होतो.असा त्रास रोज सहन करावा लागतो.कैलास मालपोटे तळेगाव एमआयडीसी कामगार
सतत पडणारा पाऊस अरुंद रस्ते त्यावरील खड्डे,प्रत्येकांना इच्छित स्थळी जाण्याची घाई यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते तरी नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळून सहकार्य करावे.गणेश लोंढे सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग.