

Shivaji Maharaj statue vandalized in Yavat
यवत: यवत(ता.दौंड)रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणाऱ्या नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना रात्री उशिरा एका युवकाने केली आहे. सकाळी पूजेला आल्यानंतर पुजाऱ्याला ही माहिती मिळाली सदर माहिती वाऱ्याप्रमाणे संपूर्ण गावात पसरली.
यानंतर शेकडो नागरिकांनी एकत्र येत सदर घटनेचा निषेध केला घटनेची माहिती मिळताच सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करत घटनेचा जाहीर निषेध केला आहे. आरोपी अजून फरार असून उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यवत पोलीस स्टेशन येथे आलेले आहेत यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. (Latest Pune News)