Talegaon Floriculture Pudhari File Photo
पिंपरी चिंचवड

Talegaon Floriculture: तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील शेतकरी संकटात; अनुदान बंद, वीज तोडणीमुळे फुलउत्पादन धोक्यात

मार्च 2023 पासून शासकीय अनुदान थांबले; नवीन टेरिफ 309 लागू, थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्क एमआयडीसी येथील शेतकऱ्यांचे मार्च 23 पासून शासकीय अनुदान मिळणे बंद झाल्यामुळे येथील फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. वीजप्रश्न, अनुदान रद्द, ग््रााहकवर्ग बदल यामुळे फूलउत्पादक शेतकरी अर्थिकदृष्ट्‌‍या अडचणीत आला आहे.

फ्लोरिकल्चर पार्क, असोसिएशन, एमआयडीसी तळेगाव येथील सर्व प्लॉटधारक व फूल उत्पादक शेतकरी यांच्या वतीने बुधवारी (दि. 25) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बळीराजा अनुदान योजना अचानक बंद करणे, ग््रााहक वर्ग बदलणे, मागील 2 ते 3 वर्षांची बिले एक रकमी आकारणे, थकबाकीच्या कारणास्तव वीज तोडणीची कारवाई याबाबत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस असोसिएशनचे सचिव मल्हार ढोले, मयूर भोसले, अद्वैत भट, शुभाग बोरी आणि फूलउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय अनुदान रद्द झाल्यामुळे जादा रकमेची बिले तसेच एक रकमी वीजबिले आल्यामुळे वीजबिले भरणे आर्थिकदृष्ट्‌‍या अडचणीचे होत असल्यामुळे वीज महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निर्णय लागेपर्यंत वीजपुरवठा खंडित करु नये याबाबत विनंती केलेली आहे. तरी वीजपुरवठा तोडणेबाबत कार्यवाही सुरू झालेली आहे. यामुळे फुलझाडांना पाणीपुरवठा करण्यात येत नसल्यामुळे फुलउत्पादन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी शासनाने यात लक्ष घालावे आणि आमच्यावरील अन्याय दूर करावा असे मल्हार ढोले यांनी सांगितले.

जानेवारी 2026 पासून फ्लोरिकल्चर ग््रााहकांसाठी 309 हा नवीन टेरिफ आणण्यात आला आहे. तसेच मार्च 23 ते डिसेंबर 25 पर्यंतचे अनुदान रक्कम चालू बिलात वर्ग करण्यात आली आहे. वीजबिल थकबाकी वसुलीसाठी वारंवार आवाहन करूनदेखील प्रतिसाद न देणाऱ्या ग््रााहकांचा वीजपुरवठा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
जयप्रकाश सागरे, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण, तळेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT