Talegaon Dabhade Municipal Council  Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Dabhade Committees Election: तळेगाव दाभाडे नगर परिषदेत समित्यांची बिनविरोध निवड

विविध समित्यांचे सभापती जाहीर; स्थायी समितीही गठित

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे: नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी गणेश काकडे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीची सभापतीपदी निखिल भगत, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती सुदाम शेळके, नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी दीपक भेगडे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी भारती धोत्रे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शैलजा काळोखे आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी संतोष दाभाडे पाटील यांची निवड झाली आहे.

शुक्रवारी (दि. 27) तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयातील सभागृहामध्ये विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन करणे, विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड करणे व स्थायी समिती गठित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या सुरुवातीलाच पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी विषय समित्यांवर सभासद निवडीबाबत आणि स्थायी समिती गठित करण्याबाबत बाबतची माहिती सदस्यांना दिली. या वेळी विषय समितीच्या सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती : सभापती : गणेश काकडे, सदस्य : मजनू नाटेकर, सिद्धार्थ दाभाडे, संदीप शेळके, संतोष भेगडे, निखिल भगत, विनोद भेगडे, सागर बोडके.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती : निखिल भगत, सदस्य : चिराग खांडगे, इंद्रकुमार ओसवाल, सत्यम खांडगे, मनीषा म्हाळसकर, आशा भेगडे, ऋतुजा भगत, हेमलता खळदे.

सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती : सुदाम शेळके, सदस्य : कमल टकले, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर, अमीर मुलानी, चिराग खांडगे, विनोद भेगडे, सूरज सातकर.

नियोजन आणि विकास समिती : सभापती : दीपक भेगडे, सदस्य : अनिता पवार, सागर बोडके, अश्विनी शेळके, स्नेहा खांडगे, मनीषा म्हाळसकर, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : सभापती : भारती धोत्रे, सदस्य : सोनाली दरेकर, संगीता खळदे, ऋतुजा भगत, स्नेहा खांडगे, शोभा परदेशी, सुरेखा भेगडे, सिया चिमटे.

महिला व बालकल्याण समिती : सभापती : शैलजा काळोखे, उपसभापती : शोभा परदेशी, सदस्य : सुरेखा भेगडे, अनिता पवार, आशा भेगडे, संगीता खळदे, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर.

स्थायी समिती : पदसिद्ध सभापती : संतोष दाभाडे पाटील, सदस्य : गणेश काकडे, निखिल भगत, शैलजा काळोखे, भारती धोत्रे, दीपक भेगडे, सुदाम शेळके, इंदरकुमार ओसवाल, संदीप शेळके, सिद्धार्थ दाभाडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT