Talegaon Gas Pipeline Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Gas Pipeline Issue: तळेगाव दाभाडे येथे गॅस पाईपलाईन काम थांबवण्याची मागणी

पाणी व वीजवाहिन्यांना धोका; भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता असल्याचा नागरिकांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे: गावभागात लिंब फाटा ते जिजामाता चौक या परिसरात सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम त्वरित थांबवावे या आशयाचे निवेदन ‌‘फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे‌’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ज्या ठिकाणाहून पाईपलाईन टाकत आहे त्याच पाईपलाईनच्या खाली तळेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 12 इंचीच्या दोन पाईपलाईन आहेत. त्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच बाजूने लाईटची केबलदेखील आहे. त्यामुळे काम करत असताना पाण्याची लाईन फुटल्याने काही दिवस गावभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच लाईटच्या केबलदेखील तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

असे असतानादेखील ज्या पद्धतीने गॅस पाईपलाईन टाकत आहेत भविष्यामध्ये पाण्याची लाईन फुटली तर खोदकाम करताना गॅसची पाईपलाईन फुटू शकते किंवा गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करत असताना पाण्याची लाईन फुटू शकते. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आताच या पाईपलाईन टाकत असताना कमीत कमी दोन फूट बाजूने टाकावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. याप्रसंगी ‌‘फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान‌’चे अध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, सरचिटणीस यशवंत कदम, उपाध्यक्ष काळोखे गुरुजी, चिटणीस जयंत कदम तसेच माजी नगरसेवक अरुण माने आधी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT