Minor girl assault case Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Crime: तळेगावमध्ये १२ वर्षीय मुलीचा विनयभंग व लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अश्लील फोटो व्हायरल करून धमकावल्याचा आरोप; कॅफेचालकासह अल्पवयीन आरोपींचा सहभाग उघड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बारा वर्षीय मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच, आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तळेगाव दाभाडे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

विपुल विश्वकर्मा (१९, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), कोझी कॅफेचे चालक यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी ३ जून रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित १२ वर्षीय मुलीसाेबत मैत्री केली. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान अल्पवयीन मुलाने विविध प्रकारे धमकावले. तुझी बदनामी करेन, तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन पीडितेकडून काही खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावरून मिळवले.

त्यानंतर हे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करून पीडितेचा विनयभंग केला. दरम्यान, अल्पवयीन मुलाने फोटो सर्वांना पाठवण्याची धमकी पीडितेला दिली. त्याआधारे तिला धमकावत तिच्यावर १० आणि १४ मे रोजी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले.

कॅफेचालकाने त्याच्या कॅफेमध्ये अशा प्रकारांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कॅफेचालक आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले. तपास तळेगाव पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT