Pimpri Chinchwad Illegal Cable Network: आकुर्डी व परिसरात अनधिकृत केबलचे जाळे; स्मार्ट सिटीऐवजी शहर विद्रुपीकरणाचा आरोप

निगडी, चिंचवड, रावेत परिसरात केबलच्या अनधिकृत जाळ्यामुळे अपघातांचा धोका वाढला; भूमिगत केबलिंगची नागरिकांची मागणी
Pimpri Chinchwad Illegal Cable
Pimpri Chinchwad Illegal CablePudhari
Published on
Updated on

आकुर्डी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे शहर स्वच्छ, सुंदर व विकसनशील ‘स्मार्ट सिटी' ठेवण्यासाठी अनेक विविध प्रकल्प व उपाययोजना राबविल्या जातात. वास्तवात मात्र उपनगरे स्मार्ट सिटीऐवजी केबल सिटीच्या विळख्यात अडकलेली दिसून येत आहेत. शहराचे विद्रुपीकरण करण्यासाठी आणि खासगी व्यावसायिक व कंपन्यांकडून शहरांमध्ये अगणित स्वरूपात अनधिकृतपणे केबलचे जाळे पसरवले जात आहे. याला एक प्रकारे प्रशासनच जबाबदार असल्याची भावना नागरिकांत आहे.

Pimpri Chinchwad Illegal Cable
PCMC Model Code Of Conduct Lifted: पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील आचारसंहिता उठली; कामकाज पूर्ववत सुरू होणार

शहरातील बहुतांश सर्व रस्त्यांवरील पथदिवे, उड्डाणपूल, उंच इमारती, टॉवर, चौकातील उंच खांब, आता तर चौकातील वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरच्या खांबावरसुद्धा अनधिकृतरित्या केबल टाकलेल्या दिसून येत आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी विकृती व विद्रुपीकरणाला हातभार लागत आहे. मात्र, या केबलच्या जाळ्याकडे प्रशासनाकडून डोळे झाक करून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

Pimpri Chinchwad Illegal Cable
PCMC City Engineer Vacancy: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता पद तीन महिन्यांपासून रिक्त; वर्णीसाठी अधिकाऱ्यांची रस्सीखेच

यांच्याकडून होतेय विद्रुपीकरण

विनापरवाना व अनधिकृतरित्या ब्रॉडबँड सर्व्हिस, वाय-फाय, सीसीटीव्ही, दूरदर्शन वाहिन्या या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून उपनगरांमध्ये खांब, इमारती, बस स्टॉप, उड्डाणपूल, गृहनिर्माण संस्था, शाळा- महाविद्यालये शासकीय अस्थापनांच्या इमारतीवर विनापरवाना केबलची जाळे विस्तारले जात आहे. यामधून आणि अनेक वेळा केबलसेवा पुरवठाधारकांमध्ये सीमावाद निर्माण होऊन अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.

Pimpri Chinchwad Illegal Cable
Made In Pakistan Blanket Controversy: चिंचवड यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ चादरीचा दावा; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांचा तपास सुरू

या भागात केबलचे मोठे जाळे

आकुर्डी, चिंचवड, निगडी, रावेत, वाल्हेकरवाडी याठिकाणी शासकीय आस्थापना, निवासी इमारती, बँक, गृहसंस्था, शाळा, बसथांबा, हॉस्पिटल, पथदिवे, खांब यावर केबलचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. याला महापालिका प्रशासन अटकाव करत नसल्याने दिवसेंदिवस अशा फुकट्या केबलधारकांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. या केबलमुळे वाहनचालक, व्यवसाय, स्थानिक नागरिक, मुले, महिला यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

केबलचे जाळे अपघताला कारणीभूत

शहरात सर्वत्र केबलचे जाळे अंदाधुंद पद्धतीने पसरलेले दिसत आहे. यामुळे चौकामध्ये खांबावर, रस्त्यावर, खासगी व शासकीय इमारतीवर पसरलेल्या जाळ्यामुळे अनेकवेळा अपघातही झाले आहेत. त्यात काहींना आपल्या शरीराचे अवयव कायमचे गमवावे लागले. तसेच, काही महिन्यांपूर्वी निगडीमध्ये केबलच्या वायरमुळे महिलेला आपला प्राण गमावावा लागला.

Pimpri Chinchwad Illegal Cable
Pimpri Chinchwad Illegal Constructions: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव; नोटीस फ्लेक्सच्या नव्या फंड्याने कारवाई

निगडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी या वाढत्या लोकवस्तीच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात या केबलचे जाळे वाढत आहे. अनेक खासगी गृहनिर्माण संस्थेच्या छतावर अनधिकृतपणे केबल टाकल्यामुळे इमारतीच्या छतावर लहान मुले, महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत केबल ज्या प्रमाणे भूमिगत केली आहे त्याप्रमाणे या सर्व केबल भूमिगत कराव्यात.

प्रमिला भेंडवळकर, सामाजिक कार्यकर्त्या, निगडी.

आमच्या खासगी गृहनिर्माण संस्थेच्या छतावरती कोणतीही परवानगी किंवा विचारपूस न करता केबल व्यावसायिक व पुरवठाधारकांकडून विविध प्रकारचे डीपी बॉक्स व केबल वायरचे अस्ताव्यस्त जाळे पसरवले असून, भव्य छत असूनही या केबल वायरच्या भीती व जाळ्यामुळे छताचा उपभोग महिला, मुले व सोसायटीधारकांना करता येत नाही. या महिनाअखेरपर्यंत पुरवठाधारकांनी केबलचे जाळे न काढल्यास पुढील कार्यवाहीसाठी निगडी- आकुर्डी पोलिसांच्या सहकार्याने सर्व प्रकारचे केबल निष्काशीत करू.

सुदर्शना धुमाळ, ज्येष्ठ सेवानिवृत्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news