ST Bus Pudhari
पिंपरी चिंचवड

ST Bus School Tour Booking: शालेय सहलींसाठी लालपरीची पसंती; वल्लभनगर आगारातून 264 एसटी गाड्यांचे बुकिंग

सुरक्षितता व सवलतीमुळे खासगी बसांपेक्षा एसटीला शाळांची पहिली पसंती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) लालपरी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. सध्या सुरू असलेल्या सहलींच्या हंगामात खासगी बसेसच्या तुलनेत शाळांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसला मोठी पसंती दिली आहे. सुरक्षित प्रवास आणि मिळणारी सवलत यामुळे ‌‘लालपरी‌’ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी सज्ज झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून 264 च्या पुढे सहलीसाठी गाडयांची बुकिंग फुल्ल झाली आहे.

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी स्वच्छ कोऱ्या, आरामदायी सुसज्ज बसगाड्या सहलीसाठी उपलब्ध करून देण्यातआल्याआहेत. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची ओळख आहे. त्यामुळे लालपरीला सहलीसाठी विशेष मागणी असते; परंतु यंदा सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद दुप्पट होणार आहे. सहलीसाठी आरामदायक आसन व्यवस्था, वातानुकुलित बसगाड्या सहलीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील अनेक शाळांनी सहलीसाठी वल्लभनगर आगारात गाड्यांसाठी बुकिंग केले आहे. वल्लभनगर आगारातून 264 गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

राज्यातील 251 आगारांतून 800 ते 1 हजार बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्यातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देता येईल. त्याामुळे साहजिकच मुलांना आपल्या राज्यातील महत्त्वांच्या ठिकाणांबाबत माहिती मिळू शकेल. तसेच पर्यटनाचाही आनंद घेता येऊ शकेल.

सुरक्षिततेची खात्री

खासगी बसेसच्या तुलनेत एसटीचे चालक अनुभवी असतात आणि गाड्यांचा वेग मर्यादित असतो. तसेच, काही तांत्रिक बिघाड झाल्यास महामंडळाकडून तात्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली जाते. महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही एसटीचा प्रवास अधिक विश्वासार्ह मानला जातो.

शालेय सहलीमार्फत गतवर्षी प्राप्त महसूल

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शाळा, महाविद्यालयीन सहलीसाठी एसटी महामंडळाकडून 19 हजार 624 बस दिल्या होत्या. या माध्यामातून एसटीला एकूण 92 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

दिवाळीनंतर सहलीसाठी शाळेकडून तयारी सुरु असते. त्यामुळे अनेक शाळांकडून बुकिंग करण्यात येत आहे. यंदा सहलीसाठी नवीन बसचे नियोजन करण्यात आले असल्याने सुरक्षित, उत्तमरित्या मुलांचा प्रवास होणार आहे.
अरुण सिया विभाग नियंत्रक पुणे एसटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT