Investment Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Senior Citizen Investment Fraud: ‘३० टक्के परताव्या’चे आमिष पडले महागात; ज्येष्ठ नागरिकाची ९.७० लाखांची फसवणूक

बँकेपेक्षा जास्त व्याज देण्याचे सांगून घेतले पैसे; मावळातील वराळे येथील प्रकरण, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​पिंपरी: बँकेपेक्षा जास्त ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. मावळ तालुक्यातील वराळे येथे ऑक्टोबर २०२३ ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.

मनोज गोपाळ देसले (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; मूळ रा. जुने मोहिंदे, नंदुरबार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप नारायण वडेलकर (७०, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवार (दि. २४) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मनोज देसले याने फिर्यादींना 'माझ्याकडे पैसे गुंतवणूक करा, मी तुम्हांला बँकेपेक्षा जास्त ३० टक्के परतावा देतो' असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश, यूपीआय आणि रोखीने असे एकूण नऊ लाख ७० हजार रुपये घेतले. रक्कम घेतल्यानंतर संशयिताने कोणताही परतावा दिला नाही; तसेच मूळ रोख रक्कमही परत न करता आर्थिक फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT