Pimpri Chinchwad Red Zone Issue: रेड झोनची हद्द कमी करा; हजारो कुटुंबांना दिलासा द्या, महापौर रवी लांडगेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे

राजनाथ सिंह यांच्याकडे कायमस्वरूपी तोडग्याची मागणी; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी दिल्ली दौऱ्यात विविध केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
Ravi Landge Ragnath Singh
Ravi Landge Ragnath SinghPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांना रेड झोनचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्याने रेड झोनची हद्द कमी करून, हजारो कुटुंबांना दिलासा द्यावा, असे साकडे महापौर रवी लांडगे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घातले आहे. या प्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्यक्ष पिंपरी-चिंचवड शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.

Ravi Landge Ragnath Singh
Moshi Waste Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत कारवाईचा बडगा; मुख्य अभियंत्यांसह दोन अधिकारी निलंबित, फायर एनओसी देणाऱ्यावरही टांगती तलवार

शहराच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी महापौर लांडगे यांनी शुक्रवारी (दि.24) दिल्ली दौरा केला. केंद्र सरकारसमोर शहराशी संबंधित महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडत विकासाचा व्यापक रोडमॅप सादर केला. नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळावा, शहराला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

Ravi Landge Ragnath Singh
Pune Metro Line 3: हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो सेवेला हिरवा कंदील; मार्गिका-३ला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी

महापौर लांडगे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवडमधील रेड झोनचा गंभीर प्रश्न मांडला. संरक्षण विभागाच्या निर्बंधांमुळे शहरातील लाखो नागरिकांना बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, मालमत्ता व्यवहार, बँक कर्जे तसेच, विविध विकासकामांमध्ये येणार्‍या अडचणींची माहिती त्यांनी दिली. या प्रश्नावर संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, संरक्षण प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त बैठकीद्वारे नागरिकांना दिलासा देणारा कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. प्रत्यक्ष पिंपरी-चिंचवड शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निमंत्रणही त्यांना महापौरांनी दिले.

Ravi Landge Ragnath Singh
Pavana Dam Overflow: पवना धरण १०० टक्के भरले; नदीला पूर, पिंपरी-चिंचवडमधील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आठ पदरीकरणासाठी प्रलंबित भूमी संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून, प्रकल्पाच्या कामास गती देण्याची मागणी करण्यात आली. भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास कायम ठेवण्यात यावा. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

दौर्‍यात केंद्रीय एमएसएमई मंत्री जितराम मांझी यांचे प्रमुख सल्लागार संदीप पोखरकर यांच्यासोबतही चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड शहरात महिला औद्योगिक क्लस्टर उभारण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे. महिलांना उद्योग-व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध व्हाव्यात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष निधी, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, याबाबत चर्चा करण्यात आली.

Ravi Landge Ragnath Singh
Pawana Dam Water Storage: पवना धरण ९३ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महापौर चषक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव

केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबतच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शहरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन, खेलो इंडिया आणि फिट इंडिया अभियानांतर्गत आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा विषय केंद्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी आहे. दिल्लीतील सर्व बैठकींमध्ये केंद्र सरकारच्या मान्यवर मंत्र्यांनी आमच्या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या असून, शहराच्या हिताच्या विषयांवर अनुकूल निर्णय होतील, असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news