Pavana Dam Water Discharge: पवना धरण १०० टक्के भरले; नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी-चिंचवडमध्ये पवनेचे पाणी वसाहतींमध्ये शिरले; मोरया गोसावी मंदिर दर्शनासाठी बंद, पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
Pavana River Flood
Pavana River FloodPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पवना धरण सध्या १०० टक्के भरल्याने पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पवनेचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या काही भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Pavana River Flood
Pimpri Chinchwad Red Zone Issue: रेड झोनची हद्द कमी करा; हजारो कुटुंबांना दिलासा द्या, महापौर रवी लांडगेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे

पिंपरी-चिंचवड शहर तसेच मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले असून, नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील रावेत-पुनावळे बंधारा पाण्याखाली गेला आहे.

Pavana River Flood
Moshi Waste Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत कारवाईचा बडगा; मुख्य अभियंत्यांसह दोन अधिकारी निलंबित, फायर एनओसी देणाऱ्यावरही टांगती तलवार

पिंपरी झुलेलाल घाटाजवळील वसाहतीत पवना नदीचे पाणी शिरले होते; तसेच चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात पवनेचे पाणी शिरल्याने शनिवार (दि. २५) दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

Pavana River Flood
Pune Metro Line 3: हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो सेवेला हिरवा कंदील; मार्गिका-३ला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी

थेरगाव येथील श्री केजुदेवी मंदिर पाण्याखाली गेले. नदीघाटावरील रहिवाशांना पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे; तसेच पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेले दोन दिवस शहर परिसरात पावसाच्या सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news