School Stationery Shopping Pudhari
पिंपरी चिंचवड

School Stationery Shopping: शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग; बाजारपेठ गजबजली

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी दुकाने फुल्ल; वह्या, बॅग व गणवेशाच्या किंमती वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्यातील सर्व शाळा येत्या सोमवारीपासून (दि. 15) सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा शालेय साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. पालकांना आता दोनच दिवस शालेय साहित्य खरेदीसाठी मिळणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील स्टेशनरी दुकानांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी होत आहे.

शालेय साहित्यांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

यंदा शालेय साहित्यांच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वह्यांच्या किंमती वाढल्या आहेत. एका वही मागे 7, 10, 15, 20 रुपयांचा फरक पडला आहे. तरी बजेटनुसार त्या खरेदी करण्याकडे पालकवर्गाचा कल दिसत आहे. मुलांच्या आवडीनुसार कार्टुन, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो असलेल्या वह्यांची खरेदी केली जात आहे. पाल्यासाठी वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, बुट, रेनकोट, छत्री, गणवेश आदी घ्यावेच लागणार असल्याने यंदा दुकानांमध्ये पालकांची गर्दी दिसत आहे.

कार्टुनसची चित्रे असलेल्या स्कूल बॅगला पसंती

लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगांच्या, कार्टुन्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास बाजारात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या व आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत. यावर कार्टुनसची चित्रे, बार्बी डॉल, अ‍ॅग्री बर्ड, स्पायडर मॅन, बेनटेन, डोरा, डोरेमॉन यांची चित्रे असलेल्या बॅगांना मुलांची जास्ती पसंती मिळत आहे. या बॅगा 300 ते दीड हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

तसेच, टिफीनसाठीदेखील विविध प्रकारच्या आकर्षक बॅग विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यावरदेखील इतर बॅगप्रमाणे कार्टुन्सची छाप पडलेली दिसून येत आहे. यांच्या किंमतीही 150 पासून ते 500 रूपयांपर्यत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बॉटल्स यांची बाजारात मोठ्या प्रमाणत आवक झाली आहे.

शालेय साहित्यांच्या किंमती वाढल्या असल्या तरी मुलांचे शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागते. शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्याने जून महिना हा खर्चाच असतो. बजेटनुसार साहित्याची खरेदी करतोय.
कल्पना पवार, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT