हवामानातील बदलामुळे रुग्ण संख्येत वाढ File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Weather: हवामानातील बदलामुळे रुग्ण संख्येत वाढ

पुढारी वृत्तसेवा

Rise in number of patients due to changing weather conditions

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून अधून-मधून बरसणार्‍या पावसामुळे वातावरणात वारंवार बदल होत आहे. त्यामुळे शहरवासीय सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखीच्या त्रासाने बेजार झाले असून, शहरातील रूग्णालयांत रूग्णांची संख्या वाढली आहे.

शहरात बांधकाम, मेट्रोचे खोदकाम, बीआरटीचे काम करण्यात येत आहे. यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अधून-मधून बरसणारा पाऊस, वातावरणातील बदल, धुळीचे वाढलेले प्रमाण या दोन्ही बाबींचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. पहाटे पडणारा गारवा, दुपारी पडणारे कडक ऊन अशा वातावरणातील बदलामुळे आजारी पडणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. (Latest Pimpri News)

हवामानातील बदलामुळे रुग्ण संख्येत वाढ शहरातील बहुतांश भागात बांधकामे सुुरु आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले आहे.

महापालिकेकडून विविध रस्त्यांचे व डागडुगेचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. या सगळया कामामुळे शहरातील सुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल, पाऊस, उन, वारा, यामुळे हवेची ढासळत असलेले गुणवत्ता याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.

सध्या अनेक रुग्णांमध्ये कोरडा खोकला, खशात खवखव, सर्दी,ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. हवेतील संसर्गामुळे आजारी पडणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रूग्णांनी डॅाक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. बाळासाहेब होडगर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, आकुर्डी रुग्णालय, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT