संगमनेर: आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याला मदत केल्याच्या आरोपावरून भास्कर लहानू खेमनर यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की 29 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमावेळी मालपाणी लॉन्स येथे प्रसाद गुंजाळ याने त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास सुरू असतानाच प्रसाद गुंजाळला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सहआरोपी म्हणून भास्कर लहानू खेमनर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
प्रसाद गुंजाळ व आमदार अमोल खताळ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्यासंबंधीचे पुरावे मिळाले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी प्रसाद गुंजाळची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.
गुंजाळच्या आईचा अर्ज
दरम्यान, प्रसाद गुंजाळ यांची आई अनिता गुंजाळ यांनी शहर पोलिसात तक्रार अर्ज दिला असून, त्यांनी म्हटले आहे, की आमदार अमोल खताळ व माझ्या मुलाचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. यात राजकारण आणू नये, यामुळे आम्हाला न्याय मिळणार नाही.