पिंपरी: संरक्षण विभागाच्या आस्थापनांनी घेरलेला तसेच, रेड झोन हद्दीत असलेल्या एखाद्या बेटाप्रमाणे हा प्रभाग आहे. रेड झोन आणि विकासकामे न झाल्याने, प्रभागात दुर्लक्ष आदी कारणांमुळे सत्ताधारी भाजपाला निवडणूक सहज नसल्याचे चित्र आहे.
या प्रभागात चारही नगरसेवक भाजपाचे आहेत. माजी उपमहापौर हिराबाई ऊर्फ नानी घुले यांचा हा प्रभाग आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक विकास डोळस यांच्या पत्नी तृप्ती डोळस, उदय गायकवाड, संजय गायकवाड, कुलपदी परांडे, श्रद्धा अकुलवार, प्रीती पठारे, आशा सुपे, सुरकुले, नामदेव रडे, रमेश वीरणक हे भाजपाकडून इच्छुक आहेत. प्रभागात विविध कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात कामे न झाल्याने अद्याप ग््राामीण भागाप्रमाणेच हा परिसर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाकडून चंद्रकांत वाळके, मालन खाडे, वैशाली दोरगे आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना, मनसे, काँग््रेास पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहे. रेड झोनची टांगती तलवार, काम न झाल्याचा मुद्दा विरोधकांकडून मांडला जात आहे. मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपा नगरसेवकांना बसू शकतो.
प्रभागातील परिसर
दिघी, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाड नगर, भंडारी स्कायलाईन, साई पार्क, समर्थनगर, कृष्णानगर, रुणवाल पार्क, विजयनगर, दिघी गावठाण, काटे वस्ती आदी, बोपखेल, व्हीएसएनएल, गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण आदी
बोपखेल-खडकी पूल झाल्याने वाहतूक सुरळीत
अनेक वर्षांपासून रखडलेला बोपखेल-खडकी पुलाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने बोपखेल हा भाग पिंपरी-चिंचवड शहराशी जोडला गेला आहे. दिघीत प्राथमिक शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. प्रसूतीगृह, अग्निशमन उपकेंद्र बांधले आहे. बोपखेलमध्ये एसटीपी व उद्यान विकसित करण्यात येत आहे. बहुउद्देशीय हॉल बांधण्यात आला आहे. कल्याण केंद्र उभारण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून पाण्याचा टाक्या बांधण्यात आल्या असून, पंपिंंग स्टेशनसह आवश्यकतेनुसार जलवाहिनी टाकण्यात आली आहे. रस्ते विकसित करून ड्रेनेजलाईन नव्याने टाकण्यात आली आहे. बोपखेल इंग््राजी माध्यम शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ- एससी महिला
ब- एसटी
क- ओबीसी महिला
ड- सर्वसाधारण
रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामांचा विळखा
संरक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे विकासकामांना मर्यादा असल्याने हा भाग विकासापासून दूर असल्याचे चित्र आहे. खासदार, आमदार तसेच, नगरसेवकांकडून दुर्लक्ष होत असल्याने परिसरात प्रशासन लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. संरक्षण विभागाचा जाच काही कमी झालेला नाही. बोपखेल हा भाग पिंपरी-चिंचवड व पुणे असे दोन महापालिकेस विभागला गेल्याने नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्य तसेच, अंतर्गत रस्ते अरुंद आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या भागात निवृत्त सैनिक राहण्यास पसंती देत आहेत. अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने झाल्याने दाट लोकवस्ती झाली आहे. मोठी दुर्घटना घडल्यास अग्निशमन बंबही पोहचणार नाही, अशी स्थिती आहे. शहराचा शेवटचा भाग असल्याने अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. मुळा नदीचे प्रदूषण वाढल्याने नदी काठच्या रहिवाशांना दुर्गंधी तसेच, डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागतो. तसेच, पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात नाल्यात पाणी साचून लोकवस्ती शिरते.