Pune Metro Pink Line Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Women Run Stations: महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोचा उपक्रम; पिंपरी-चिंचवडमधील तीन स्टेशन महिलांच्या ताब्यात

पिंपरी, संत तुकारामनगर आणि नाशिक फाटा स्टेशनचे संपूर्ण संचालन महिला कर्मचाऱ्यांकडे; महिला सक्षमीकरणाचा संदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि. 8) पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन स्टेशनचे संपूर्ण कामकाज महिला कर्मचारी सांभाळणार आहेत. पिंपरी, संत तुकारामनगर आणि नाशिक फाटा या मेट्रो स्टेशनचा कारभार महिलांच्या हाती असणार आहे.

महिला दिनानिमित्त महामेट्रोने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या आठ प्रमुख स्टेशनचे संपूर्ण संचलन केवळ महिला कर्मचाऱ्यांमार्फत केले जाईल. या निर्णयाद्वारे मेट्रो प्रशासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत महिलांचे महत्त्व आणि कर्तृत्व अधोरेखित केले आहे. त्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन स्टेशनचा समावेश आहे. महिलांचे कर्तृत्व आणि त्यांच्याकडे असलेल्या विविध क्षमतांचा सन्मान करण्यासाठी पुणे मेट्रोने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून महिलांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, यातून प्रवाशांनादेखील एका वेगळ्या आणि प्रेरणादायी अनुभवाची संधी मिळेल.

महिला सक्षमीकरणाला चालना

महिला हे समाजाचा खरा आधारस्तंभ आहेत. त्यांचे सर्व क्षेत्रात योगदान अतुलनीय आहे. पुणे मेट्रोने महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातील एकूण स्टेशनचे संचलन महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवून त्यांच्या कर्तृत्वाला अधोरेखित केले आहे. हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे जे महिला सक्षमीकरणाला चालना देईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT