Pimpri Mayor Fund Distribution: महापौर निधी पुन्हा सुरू, रुग्णांना आर्थिक मदत

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर निधी प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा सुरू. गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार, 2026-27 अर्थसंकल्पात निधीसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: प्रशासकीय राजवटीत तब्बल चार वर्षे बंद असलेला महापौर निधीचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. एका रुग्णाला मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश वाटपास सुरुवात केली आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवार (दि. 6) सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Global Capability Centre Jobs: पिंपरी-चिंचवड बनतेय ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचे हब; 4 लाख रोजगारांची शक्यता

प्रशासकीय राजवटीच्या लालफितीमुळे महापौर निधी बंद; शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक होरपळ, असे ठळक वृत्त ‌‘पुढारी‌’ने 17 फेबुवारीला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महापौर लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Tukaram Maharaj Birthplace Development: देहूतील संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिराचा विकास आराखडा; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

ट्रस्टचे अध्यक्ष महापौर असून, ट्रस्टमध्ये उपमहापौर (उपाध्यक्ष), सहआयुक्त (सचिव), मुख्य लेखापाल (खजिनदार), स्थायी समितीचे अध्यक्ष, विधी समितीचे सभापती, सत्तारूढ पक्षनेते, मुख्य लेखा परीक्षक व क्रीडा विभागाचे उपायुक्त (सदस्य) यांचा समावेश आहे. तसेच, आयुक्तांनी त्या ट्रस्टच्या नावाने सन 2026-27च्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PMRDA Development Projects: पीएमआरडीए चे 43 हजार कोटींचे 204 प्रकल्प; इनर रिंग रोडसह पुण्याचा विकास वेगात

त्यासंदर्भात महापौर लांडगे यांनी सांगितले की, शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक होरपळ होऊ नये म्हणून तातडीने कार्यवाही करीत बंद असलेला ट्रस्ट पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच, अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. रुग्णांना आर्थिक मदत देण्यास सुरूवात केली आहे. त्याचा पहिला धनादेश तयार करण्यात आला आहे. येत्या सोमवारी (दि.9) रुग्णास धनादेश दिला जाईल.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Ajit Srushti: चिंचवडमध्ये उभारणार ‘अजितसृष्टी’; अजितदादांच्या कामांचा भव्य स्मारक प्रकल्प

या निधीसंदर्भात शहरातील गोरगरीब रुग्णांनी महापौर कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. ती मदत तुटपुंजी असून, त्यात वाढ करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्थसंकल्पात महापौर विकास निधीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे महापौरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news