मोशी : देहू-आळंदी मार्गावरील मोई फाट्याच्या समोरील बाजूस (मजूर अड्ड्याच्या) बाजूला रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. चारही बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे. तसेच धुळीचे साम—ाज्य आहे. यातून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघात घडत आहेत. यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने येथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Latest pcmc News)
मोई फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. येथे कामगार नाका असल्याने पहाटेपासून नागरिकांची येथे गर्दी दिसून येते. यात रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनांचा वेग मंदावला जातो. सकाळी कंपन्यांमध्ये जाणार्या नागरिकांची घडबड, त्यांच्या गाड्या तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या बस यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदरी असते. त्यात खड्डेयुक्त रस्त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मागील दोन आठवड्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांचा त्या ठिकाणी अपघात झाला. पूर्वी पिंपरी चिखली मार्ग, मोईकडे जाणारा मार्ग तसेच मोशीकडे जाणारा मार्ग या चौकातून होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. आता वाहतूक विभागाने येथील वाहतुकीत बदल केल्याने कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु, या भागातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने तसेच गौण खनिजांची वाहतूक होत असल्याने येथील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे दुचाकींना अपघात घडत आहेत. अनेकांना या परिसरात आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकदा मोठ्या हायवाच्या खाली दुचाकीचालक येऊन जीव गमवण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मोई फाट्यावर तसेच चिखलीकडे जाणार्र्या मार्गावर ड्रेनेजलाईन तुंबली आहे. त्यातून मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करणार्या पादचार्यांच्या अंगावर हे पाणी वाहने जवळून गेली की उडून येत आहे. यामुळे वाहनचालक व पादचारी यांच्यात वाद निर्माण होत आहेत. स्ट्रॉमवॉटर लाईनमधून होणार्या गळतीमुळे रस्ता अधिकच खराब झाला आहे. रस्त्याचे कडेला मोठे चर पडले आहेत. रस्त्यावर खडी, माती साफ करणे आवश्यक आहे.