राखी पाठविण्यासाठी पोस्ट विभागही सज्ज Pudhari
पिंपरी चिंचवड

Raksha Bandhan 2025: राखी पाठविण्यासाठी पोस्ट विभागही सज्ज

दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भावा-बहिणीच्या प्रेमाचा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. दूरगावी असणार्‍या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग दिसून येत आहे; तसेच दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.

यावर्षीदेखील पोस्टाने राखी पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत. शहरातील 34 पोस्ट कार्यालयात दररोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत असून, त्या पोस्टातून विविध ठिकाणी पाठविल्या जात आहेत. (Latest Pimpri News)

येत्या 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन येणार आहे. रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा केवळ एक सण नाही, तर लोकांसाठी एक भावनादेखील आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भावंडे कितीही दूर असली तरी या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला राखी बांधायची असते. आजकाल लोक कामामुळे एकमेकांकडे जाऊ शकत नाहीत. अशावेळी ते इंडियन पोस्टच्या मदतीने आपल्या भावाला राखी पाठवू शकतात.

राखीसाठी वॉटरप्रुफ लिफाफा

पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफआहे. जर तुम्ही राखी पोस्टच्या माध्यमातून तुमच्या भावासाठी पार्सल पाठवत असाल तर तो लिफाफा व्यवस्थित तुमच्या भावापर्यंत पोहोचेल. लिफाफा तुमच्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून खरेदी करू शकाल. पावसाळा असल्यामुळे राखीचे पार्सल ओले होण्याची भीतीही असतेच; मात्र लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील.

पार्सल पाठवल्यानंतर ते कुठे पोहोचले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. इंडियन पोस्टने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे की, लोकांना आपला लिफाफा कुठे पोहोचला आहे हे फक्त एका क्लिकवर कळू शकते. अवघ्या एका क्लिकवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

स्पीड पोस्ट, रजिस्टर, सामन्यत: वजनानुसार 5 रुपयाचे तिकीट लावून राखी पाठवू शकतात. ग्राहकांना जशी गरज आहे त्याप्रमाणे राखी पाठवू शकतात. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करण्याची सुविधा आहे. रजिस्टरसाठी 22 रुपये, स्पीड पोस्ट पुण्यात 18 रुपये आणि पुण्याच्या बाहेर असेल तर 41 रुपये आहे वजनाप्रमाणे दर बदलत राहतात. बाय एअर मेल सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टने राखी पाठविली तर ट्रँकिंगची सुविधा आहे.
- के.एस. पारखी ( जनसंपर्क निरीक्षक, पिंपरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT