पिंपरी : जिल्ह्यातील आगीच्या घटना, अपघात, रिक्स्यू आणि सेवा देण्यासाठी अग्निशमन सेवा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, खासगी एजन्सीच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात नागरी आणि ग््राामीण सेवेतील दुवा, उपकरणे, मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचा अभ्यास यासह ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा निधी शिल्लक ठेवण्यात येणार आहे.PMRDA fire service, पुणे अग्निशमन सेवा, पिंपरी-चिंचवड आग सेवा,
अग्निशमन सेवा प्रस्थापित करण्यासाठी क्षेत्रफळानुसार आवश्यक अग्निशमन केंद्र तसेच, लोकसंख्येनुसार किमान आवश्यक वाहने, तसेच यंत्रसामग््राी, उपरकणे याबाबत केंद्र शासनाच्या स्थायी अग्निशमन सल्लागार कौन्सिलच्या शिफारशीनुसार काही नियम आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील प्रामुख्याने 9 तालुक्यांसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील काही भागांतील सेवा सुधारण्यासाठी भर देण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक तालुक्यात चांगली सेवा देण्यासाठी तांत्रिक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
नागरी भागासाठी अग्निशमन सेवा प्रतिसाद कालावधी हा कमाल 5 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. तसेच, ग््राामीण भागासाठी तो 20 मिनिटांचा असेल, असे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे नागरी भागासाठी 10 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी एक अग्निशमन केंद्र आवश्यक असून, ग््राामीण भागासाठी प्रति 50 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी आवश्यक आहे. दरम्यान, 50 हजार लोकसंख्येसाठी एक फायर इंजिन म्हणजेच अग्निशमन वाहन आवश्यक असून, 3 लाखांपर्यंत 6 फायर वाहन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 3 ते 5 लाख लोकसंख्येसाठी 1 रेस्क्यू टेंडर आवश्यक आहे.
अग्निशमन पायाभूत सुविधांचा अभ्यास
लोकसंख्याच्या अनुषंगाने फायर लोड ॲनलायसेस
रिस्पान्स टाईम मॅपिंग, कैटगराइजेशन करणार
आवश्यक केंद्र, उपकरणे, मनुष्यबळ, गरजेचा आराखडा
नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्याचा विचार करता काही बदल करणे आवश्यक असल्याने त्यानुसार आराखडा तयार करण्यात येईल. त्याचा आढावादेखील घेण्यात येत आहे.देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए