Pimpri 26 Ward Politics Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात पुन्हा भाजप वर्चस्व की विरोधकांचा पलटवार?

भाजप, राष्ट्रवादी (अजित व शरद पवार) आणि आपमध्ये अटीतटीची लढत; शहराध्यक्ष थेट रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गेल्या निवडणुकीत भाजपाचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले होते. यंदाही असाच करिश्मा करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. तर, विरोधातील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास तसेच, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे हे रिंगणात आहेत. या लढती शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाचे संदीप कस्पटे, ममता गायकवाड, आरती चोंधे तसेच, तुषार कामठे असे भाजपाचे पॅनेल विजयी झाले होते. भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भष्टाचाराला विरोध करत तुषार कामठे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. ते राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत.

काँग््रेासचे शहराध्यक्ष असलेले सचिन साठे हे भाजपात असून, त्यांच्यासह संदीप कस्पटे, गणेश कस्पटे, ममता गायकवाड, विनायक गायकवाड, आरती चोंधे, संकेत चोंधे, नितीन इंगवले, स्नेहा कलाटे, रणजीत कलाटे तसेच, अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासकडून शिरीष साठे, संकेत जगताप व इतर काही जण इच्छुक आहेत. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे इच्छुक आहेत. तसेच, इतर पक्षांकडून काही जण इच्छुक आहेत. भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. दोन शहराध्यक्ष आणि एक माजी शहराध्यक्ष अशा सरळ लढतीत कोण बाजी मारणार, भाजपा प्रभागातील आपल्या पॅनेलवर कब्जा राखण्यास यशस्वी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

प्रभागातील परिसर

पिंपळे निलख, विशालनगर, पार्क स्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्त मंदिर परिसर, अण्णा भाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स आदी.

मुळा नदी सुधार योजनेचे काम सुरू

मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम पिंपळे निलख येथे सुरू करण्यात आले आहे. नदी व काठ अधिक सुंदर होणार आहे. प्रभागात काँक्रीटचे रस्ते विकसित करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक बनवून सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच, पददिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत. उद्यानांचे व चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

जुनी ड्रेनेजलाईन बदलून अधिक व्यासाची टाकण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. पावसाळी गटाराची कामेही झाली आहेत. नदी प्रदूषण होऊ नये, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. रक्षक चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून भुयारी मार्ग तसेच, पिंपळे निलखकडे जाण्यासाठी ग््रेाडसेपरेटर तयार करण्यात येत आहे. महापालिका शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा दिल्या जात आहेत. साई चौक, विशालनगर येथे भुयारी मार्ग विकसित केला आहे.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी

  • ब-ओबीसी महिला

  • क-सर्वसाधारण महिला

  • ड-सर्वसाधारण

बाणेरकडे जाणारा पूल धूळ खात

प्रभागातील समस्या-हाऊसिंग सोसायट्या, बैठी घरे, बंगलो, रो हाऊस, गावठाण, शॉपिंग मॉल, हॉटेल्स असलेला हा संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग आहे. पुणे शहराच्या सीमेला लागून पिंपळे निलखचा भाग आहे. आयटी पार्कमधील अभियंते या भागात मोठ्या संख्येने राहतात. अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने, पार्किंग झोन नसल्याने वाहतूककोंडी होते. विशालनगर व बाणेरला जोडणारा मुळा नदीवर पूल अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे. शहराच्या बाजूने सर्व काम झाले आहे. मात्र, पुण्यातील बाणेरच्या बाजूने जागा ताब्यात न आल्याने जोडरस्ता झालेला नाही. नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. पावसाळ्यात मुळा नदीला पूर आल्याने लोकवस्तीत पाणी शिरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT