

पिंपरी: शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षातून भाजपात गेल्याने या प्रभागातील राजकारण पूर्णपणे फिरले आहे. विरोधक सत्तेच्या बाजूने आल्याने निष्ठावंतांसह इतर विरोधक संभमात पडले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या या प्रभागात गेल्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे राहुल कलाटे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे मयूर कलाटे हे निवडून आले होते. शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादीचे एक नगरसेवक असे प्रभागातील बलाबल होते.
भाजपाकडून राहुल कलाटे, चेतन भुजबळ, राम वाकडकर, संदीप पवार व त्यांच्या पत्नी, विशाल कलाटे, रेश्मा भुजबळ, विनायक गायकवाड, ममता गायकवाड, स्वप्निल बनसोडे व अनेक जण इच्छुक आहेत. भाजपा-आरपीआय युती असल्याने तेथे आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर हे इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून मयूर कलाटे, विशाल वाकडकर तसेच, संजय कलाटे, अजित पोपटराव पवार, अर्पिता पवार व इतर इच्छुक आहेत. राहुल कलाटे हे भाजपामध्ये गेल्याने पक्षातील निष्ठावंत तसेच, इच्छुकांचा गोंधळ उडाला आहे. प्रभागातील बदलेल्या समीकरणामुळे कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील परिसर
माळवाडी, पुनावळे, पांढारेवस्ती, काटेवस्ती, नवलेवस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसेवस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राईड रेसिडन्सी आदी.
मडीपी रस्ते विकसित केल्याने कनेक्टिव्ही
प्रभागात वेगवेगळ्या भागांतील एकूण 27 डीपी रस्ते विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी 15 रस्ते हे काँक्रीटचे आहेत. अर्ब स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक करण्यात येत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढली आहे. वाकड, पुनावळे व ताथवडे येथे पाण्याचा तीन टाक्या बांधण्यात आल्या असून, एका टाकीचे काम पूर्णात्वाकडे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाकड येथे सीबीएसबी स्कूलची अद्ययावत नवीन इमारत बांधण्यात आली आली आहे.
त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील पाल्याने दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यात आले आहे. पुनावळे येथे ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आले आहे. तानाजी कलाटे उद्यान उभारण्यात आले आहे. ड्रेनेजलाईन व जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या आहेत. एसटीपी केंद्र क्षमता वाढविण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहेत. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
सर्वाधिक कर भरणाऱ्या भागात वाहतूक कोंडीचा त्रास
पिंपरी-चिंचवड महापालिकेस सर्वाधिक मालमत्ताकर भरणार वाकड परिसर आहे. प्रभागात मोठ्या संख्येने टोलेजंग हाऊसिंग सोसायट्या तसेच, शॉपींग मॉल व काही शैक्षणिक संस्था आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील अभियंते या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. लोकवस्तीसोबत वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास आहे. पुनावळे व ताथवडे परिसरातल रस्ते खराब आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. काळा खडक येथे रस्ता रुंदीकरणाचे काम प्रलंबित असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. दुकानदार, विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने अनेक हाऊसिंग सोसायट्यांना खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागते. पुनावळे व ताथवडे भागांत मोठ्या संख्येने गृहप्रकल्पांचे काम होत असल्याने कर्कश आवाज व वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होत आहेत. भूमकर चौक व भुजबळ चौकात खासगी ट्रॅव्हर्ल्स बस थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.