Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या भाजी मंडईत टोमॅटो, लसूण स्वस्त; ऑक्टोबर हिटमुळे पालेभाज्या महागल्या

टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, लसूण १२० ते १५० रुपये; उन्हाच्या तडाख्यामुळे भाज्यांच्या दरात १० ते २० रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. १८) टोमॅटोची आवक जास्त झाल्याने टोमॅटो २० - २५ रूपये दर होता. मेथीची आवक घटल्याने ३० - ३५ रुपये जुडी होती. वाटाणा १६० रुपये. काळा घेवडा व पांढरा घेवडा १२० रुपये किलो होता. बाजारात लसणाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने लसूण स्वस्त झाला आहे. २०० - २५० रुपये दर असणारा लसूण या आठवड्यात १२० - १५० रुपये किलो झाला आहे.

आले देखील १०० - १२० रुपये किलो दर होता. हिरव्या मिरचीचे दर देखील खाली घसरले असून ७० - ८० रुपये किलो दर होता. सध्या ऑक्टोबर हिटमुळे भाज्यांचे नुकसान आणि आवक मंदावल्याने सर्वच फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांचे देखील उन्हाच्या तडाख्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० - २० रुपयांची वाढ झाली आहे.

कांद्याचे दर तेजीतच होते. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने होते. कांदे ५० - ६० रुपये, गाजर ४० - ५० रुपये, बीट ४० रुपये, वाटाणा १०० - १५० रुपये, बीन्स ६० रूपये, राजमा ७० रुपये, वांगी ४० रुपये, गवार ६०- ७० रुपये, शेवगा ७० - ८० रुपये, दोडका ५० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, कोबी ३० रुपये, काकडी ५० रुपये, टोमॅटो २५ रुपये, शिमला ५० रुपये, मिरची ८० रुपये, लसूण १०० रुपये, आले १०० रुपये, तोंडली ७० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये असे दर होते.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

रविवारी बाजारात गवार ८०- १०० रुपये किलो, गावरान गवार २०० रुपये किलो, शेवगा ७० रुपये किलो होता. वाटाणा १००- १५० रुपये, टोमॅटो ३० रूपये, भेंडी ७० रुपये किलो, फ्लॉवर ५० रुपये, कोबी ३० रुपये, मिरची १२० रुपये, गाजर ५० रुपये, शिमला ६० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ६० रुपये, काकडी ४० रुपये, कारले ६०, कांदे ५० - ६० किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स ७० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा ४० - ५० रुपये, घोसाळी ४०, दोडका ५० - ६० रुपये, तोंडली ६० रुपये, बीट ४० रुपये, दुधी २५, होता.

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर ३० रुपये, मेथी ३०-३५ रुपये, पालक २० रुपये, शेपू २० रुपये, राजगिरा २०, पुदिना १५ रूपये, मुळा १५ रुपये, चवळई १५, लाल माठ ३०, हिरवा माठ ३०, करडई १५, कांदापात २० रुपये, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रूपये, गवती चहा १०, लाल देठ ३०-४० रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ८० रुपये, गावरान गवार २०० रुपये किलो, गवार ९० रुपये, पावटा १५०, तोंडली ७० रुपये, बीट ५०, दोडका ७०, कारली ८०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०- ८० रुपये, मिरची ८०, फ्लॉवर ६०, कोबी ४०, वांगी ७०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ५० रुपये, आरबी ८० रुपये किलो, सिमला ११० रुपये, राजमा १२०, बिन्स ८०, गाजर ५० रुपये किलो, आरवी ८०, रताळी ८० - ९० रुपये, टोमॅटो ३० रुपये .

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा २५, बटाटा १०, लसूण १००, आले ६० , भेंडी ३०, गवार ७०, टोमॅटो १०, वाटाणा ९०, घेवडा ३०, दोडका ३०, हिरवी मिरची ४०, दुधी भोपळा २५, काकडी २५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर २५, कोबी १०, ढोबळी ३०, वांगी ३५, शेवगा ५०, घोसाळी २५, लिंबू १००, मका कणीस ५० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४३००, पालेभाजी ४४७०० (गड्डी), फळे आवक ८१८, कांदा ४००, बटाटा १०२७, लसूण १९, आले ७३, भेंडी १५९, गवार १८, टोमॅटो ७३३, वाटाणा २४, घेवडा ४०, दोडका ६०, हिरवी मिरची १६२, दुधी भोपळा ९४, काकडी १८०, कारली ५७, डांगर ८०, गाजर ६२, फ्लॉवर ४७३, कोबी २२३, वांगी १४७, ढोबळी ८७, बीट ३५, शेवगा ३५, लिंबू ३५, मका कणीस ६३, तोंडली १६, रताळी २० क्विंटल अशी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT