Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीत भाजीपाल्याचे दर कडाडले; शेवगा ८०, गावरान गवार १५० रुपये किलो

ऑक्टोबर हिटचा भाज्यांना फटका; लसूण, आले आणि लिंबू महागले, मोशी उपबाजारातील घाऊक दरात मात्र तफावत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. २५) शेवगा आणि गवार ६०-८० रुपये किलो दराने विक्री केली जात होती. आवक जास्त झाल्याने टोमॅटो २०-२५ रुपये किलो दराने विक्री केला जात होता. मेथीची आवक घटल्याने ३०-३५ रुपये जुडी होती. वाटाणा १४० रुपये. काळा घेवडा व पांढरा घेवडा १२० रुपये किलो दराने विक्री केला जात होता. लसणाचे दर वाढले असून २०० - २५० प्रतिकिलो २५० रुपयांना विक्री केली जात आहे. आले देखील १०० - १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

हिरव्या मिरचीचे दर अद्यापही जादा आहेत. ऑक्टोबर हिटमुळे भाज्यांचे नुकसान आणि आवक मंदावल्याने सर्वच फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० - २० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याचे दर तेजीतच आहेत. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदे ५० - ६० रुपये, गाजर ४० - ५० रुपये, बीट ४० रूपये, वाटाणा १०० - १५० रूपये, बीन्स ६० रुपये, राजमा ७०, वांगी ४०, गवार ६० - ७०, शेवगा ७० - ८० रुपये, दोडका ५० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, कोबी ३० रुपये, काकडी ५० रूपये, टोमॅटो २५ रुपये, शिमला ५० रुपये, मिरची ८० रुपये, लसूण १०० रुपये, आले १०० रुपये, तोंडली ७० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये असे दर आहेत.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

रविवारी बाजारात गवार ६० रुपये किलो, गावरान गवार १५० रूपये किलो, शेवगा ६० रुपये किलो होता. वाटाणा १०० - १५० रुपये, टोमॅटो ३० रुपये, भेंडी ७० रुपये किलो, फ्लॉवर ५० रुपये, कोबी ३० रुपये, मिरची ८० - १०० रुपये, गाजर ५० रुपये, शिमला ६० - ८० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ५० - ६० रुपये, काकडी ४० रुपये, कारले ५० - ६०, कांदे ४० - ५० किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स ७० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा ४० रुपये, घोसाळी ४०, दोडका ५० रुपये, तोंडली ५० रुपये, बीट ५० रुपये, दुधी २५ रुपये किलो असे दर आहेत.

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर २० रुपये, मेथी ३० रुपये, पालक २० रुपये, शेपू २० रुपये, राजगिरा २०, पुदिना १५ रूपये, मुळा २५ रूपये, चवळई १५, लाल माठ ३०, हिरवा माठ ३०, करडई १५, कांदापात २० रुपये, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रूपये, अंबाडी १५, लाल देठ ३० - ४० रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ८० रुपये, गावरान गवार १५० रुपये किलो, गवार ८० रुपये, पावटा १००, तोंडली ७० रुपये, बीट ६० , दोडका ६०, कारली ६०, भरताची वांगी ५०, भेंडी ७० - ८०रुपये, मिरची १००, फ्लॉवर ६०, कोबी ४०, वांगी ७०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ५० रुपये, आरबी ८० रुपये किलो, सिमला ८० रुपये, राजमा १२०, बिन्स ८०, गाजर ६० रुपये किलो, आरवी ८०, रताळी ८० - ९० रुपये, टोमॅटो ३० रुपये .

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा ३०, बटाटा १५, लसूण १३०, आले ४५ , भेंडी ३०, गवार ४५, टोमॅटो १०, वाटाणा ७०, घेवडा ३५, दोडका ३०, हिरवी मिरची ५०, दुधी भोपळा २५, काकडी २५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर २५, कोबी १०, ढोबळी ४०, वांगी ३५, शेवगा ५०, घोसाळी २५, लिंबू १००, मका कणीस ५० रुपये प्रतिकिलो दर आहेत.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ५००५, पालेभाजी ४७६०० (गड्डी), फळे आवक ५५९, कांदा ६४०, बटाटा १०६०, लसूण ५८, आले ४५, भेंडी १११, गवार २०, टोमॅटो ८०१, वाटाणा १४, घेवडा ३०, दोडका ४३, हिरवी मिरची २४२, दुधी भोपळा १०३, काकडी १९८, कारली ६५, डांगर ७७, गाजर १६९, फ्लॉवर ४७६, कोबी ९४, वांगी ९४, ढोबळी ११२, बीट २३, शेवगा १६, लिंबू १९, मका कणीस ५६, तोंडली १७, रताळी ७ क्विंटल इतकी आवाक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT