Lemon Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत लिंबाचे दर 240 रुपयांपर्यंत; उन्हामुळे दरवाढ

पालेभाज्यांमध्ये 5-10 रुपयांची वाढ; फळभाज्या तुलनेने स्थिर, उन्हाळी मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 12) कडक उन्हामुळे लिंबाचे दर वधारले होते. 200 ते 240 रुपये किलो दराने लिंबाची विक्री केली गेली. इतर फळभाज्यांचे दर ग््रााहकांच्या आवाक्यात होते, तर पालेभाज्यांच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

150 ते 200 रुपये किलो दराने विक्री केली जाणारी गवार आणि शेवगा आता 80 ते 100 रुपये किलो दराने मिळत होता. तर, वांगी, फ्लॉवर आणि कोबीचे 40 रुपये किलो दर हेोते. मिरची 60 रुपये, कर्नाटक कैरीचा 50-60 रुपये किलो दर होता. बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांचे दर 30 रुपये प्रतिजुडी होते. कांद्यांचे 100 रुपयांना पाच किलो दर होते. लसूण 100-150 तर आले 60-80 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. तर, कारली 60, भरताची वांगी 40 आणि घोसाळे 60 रुपये किलो दराने मिळत होते. सध्या लग्नसराईचे दिवसे असल्यामुळे भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती.

फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे (रुपयांत)

गवार 80-100,शेवगा 80, टोमॅटो 20, भेंडी 60, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 60-70, गाजर 30, शिमला 50, लसूण 100-120, आले 50, वांगी 30, काकडी 40, कारले 50, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 60, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 50, दुधी 40, घेवडा 60.

पिंपरी बाजारातील पाले भाज्यांचे प्रति जुडी दर (रुपयांत)

कोथिंबीर 30, मेथी 30, पालक 30, शेपू 30, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 30, चवळई 30, लाल माठ 25, कांदापात 30, करडई 20, आळू पाने 10 रुपये जुडी, चुका 30.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रुपयांत)

शेवगा 100, गवार 100, पावटा 70, तोंडली 70, बीट 60, दोडका 60, कारली 60, भरताची वांगी 50, भेंडी 70 रुपये, मिरची 60, फ्लॉवर 40, कोबी 40, वांगी 50, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, परवल 80, सुरण 80, मद्रास काकडी 40, आरबी 50, सिमला 50-60, राजमा 70, बिन्स 90, गाजर 50, आरवी 70-80, रताळी 60, टोमॅटो 30, काकडी 50.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रति किलो रुपयांत)

कांदा 8, बटाटा 10, लसूण 90, आले 35, भेंडी 25, गवार 50, टोमॅटो 7, वाटाणा 80, घेवडा 40, दोडका 25, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 15, काकडी 25, कारली 20, गाजर 25, फ्लॉवर 15, कोबी 15, वांगी 15, बीट 0, शेवगा 40, घोसाळी 30, लिंबू 100, शिमला 25, परवल 0, मका कणीस 100.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी 4165, पालेभाजी 37500 (गड्डी), फळे आवक 1194, कांदा 762, बटाटा 641, आले 76, लसूण 5, भेंडी 145, गवार 28, टोमॅटो 619, वाटाणा 37, घेवडा 88, दोडका 25, हिरवी मिरची 148, दुधी भोपळा 97, काकडी 329, कारली 18, डांगर 25, गाजर 167, फ्लॉवर 349, कोबी 161, वांगी 116, ढोबळी 59, बीट 13, शेवगा 48, लिंबू 40, मका कणीस 25, तोंडली 5, रताळी 10.

बाजारात बदाम आंबा विक्रीस

पिंपरी बाजारात बदाम आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने 150 ते 200 रुपये डझन दराने विक्री केला जात आहे. सध्या दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने खरेदीकडे नागरिकांचा कल दिसत होता.

उन्हामुळे रसदार कलिंगड आणि खरबुजांना जास्त मागणी होती. सध्या कलिंगड 20 रुपये किलो दराने मिळत हेोते. द्राक्षांची आवकही वाढली आहे. उन्हामुळे रसदार फळांना मागणी वाढली आहे. संत्री 200 रुपये किलो दराने विक्री मिळत होती. मंडईत विलायची केळी 120 रुपये किलो दराने विक्रीस उपलब्ध आहेत.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे (रुपयांत)

सफरचंद 150-200, मोसंबी 150, संत्री 200, डाळिंब 200-250, पेरू 100, पपई 50-60, दाक्षे 180, कलिंगड 20, केळी 50-60 रूपये डझन, खरबूज 60, अननस 100-120 प्रतिनग, ड्रॅगनफ्रुट 300, स्ट्रॉबेरी 100, किवी 120-130, चिकू 50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT