Pimpri Temperature: पिंपरी-चिंचवडचा पारा 38 अंशांवर

वाढत्या उष्म्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.
Pimpri Temperature
Pimpri TemperaturePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शनिवार (दि. 11) शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. वाढत्या उष्म्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

सकाळी नऊनंतर उन्हाचा चटका जाणवत आहे. गेल्या आठवड्यामध्ये उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा तापमानाचा पारा वाढल्याने दुपारी उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक उन्हामध्ये फिरणे टाळत आहेत. घरात, कार्यालयात पंखे, कुलरचा वेग वाढत आहे. उकाड्यामुळे विजेचा वापरदेखील वाढला आहे.

Pimpri Temperature
Pimpri Chinchwad Water Cut: शहरात पाणीकपात नाही; महापालिका आयुक्तांची माहिती

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी बाजारात नवीन पंखे, कुलर, एसी तसेच सुती कपडे, गॉगल, टोपी यांची खरेदी केली जात आहे. रस्त्यावर फळाचा रस, उसाचा रस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळे, ताक, पन्हे यांची दुकाने वाढू लागली आहेत. फळ बाजारातदेखील कलिंगड आणि खरबूज यांना मागणी वाढली आहे. दूध डेअरीवर दही, लस्सी, ताक पिण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढू नये, उष्माघातापासून बचाव म्हणून रसदार फळे व भाज्यांचे सेवन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news