Gold Chain Theft Pudhari
पिंपरी चिंचवड

Gold Chain Theft: पिंपरीत भाजीपाला मार्केटमध्ये सोन्याचा बदाम हिसकावला; आरोपी पकडला

रिक्षाचालकाने मुलाच्या गळ्यातून 25 हजारांचा सोन्याचा बदाम हिसकावला; नागरिक आणि पोलिसांनी रंगेहात पकडले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भाजीपाला मार्केटमध्ये पत्नी मुलांसह भाजीपाला खरेदी करत असताना एका रिक्षाचालकाने मुलाच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचा बदाम हिसकावला. त्यानंतर पळून जात असताना बाजारातील लोक आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. (Latest Pimpri chinchwad News)

ही घटना मंगळवारी (दि. 14) सायंकाळी किवळे येथील केव्हीला सोसायटीसमोरील भाजीपाला मार्केट येथे घडली. याबाबत दत्तात्रय रामदार बेलकर (41, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कैलास शामराव खाडे (26, रा. निगडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी उज्ज्वला मुलांसह किवळे येथील भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असताना, आरोपी कैलास खाडे याने फिर्यादीचा मुलगा सार्थक याच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे बदाम हिसकावले. चोरी करून पळून जात असताना नागरिकांनी आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले.

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

मित्राला मारहाण होत आल्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याने राग मनात धरून तीन जणांनी एका तरुणाला लाकडी दांडका, कटर आणि चॉपरने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री ओटा स्क्रिम अंकुश चौक, निगडी येथे घडली. या प्रकरणात अल्तमश साजिद खान (23, रा. ओटास्क्रिम, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT