Voter List Objections: मतदारयादीवर हरकतीसाठी रहिवासी पुरावे अनिवार्य

अर्धवट किंवा पुरावे नसलेले हरकत अर्ज विना कार्यवाही निकाली काढणार – मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम
Voter List Objections
Voter List ObjectionsPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादी विरुद्ध मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत, परंतु त्यासोबत रहिवासी पुरावे देणे आवश्यक आहे. सबळ पुरावे व परिपूर्ण अर्ज नसल्यास संबंधित अर्ज विना कार्यवाही निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.  (Latest Pimpri chinchwad News)

Voter List Objections
Valvan Exit accident: हायवा उलटल्याने चालकाचा मृत्यू; वलवण एक्झिटवर भीषण अपघात

मोठ्या प्रमाणात हरकती दाखल

याबाबत मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी सोमवारपर्यंत (दि. 13) मुदत दिली होती. या कालावधीत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून, हरकतींसाठी शुक्रवारपर्यंत (दि. 17) मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु, दाखल झालेल्या अर्जाची प्राथमिक पाहणी केली असता या अर्जासोबत हरकतीसंदर्भात रहिवासी पुरावे सादर केले असल्याचे दिसून येत नाही.

Voter List Objections
Diwali market Kamshet: दिवाळीचा उत्साह ओसंडला! कामशेतची बाजारपेठ आकाश कंदील आणि पणत्यांनी सजली

रहिवासी पुरावे दाखल करा

नागरिकांनी हरकत अर्ज सादर करतेवेळी सोबत परिपूर्ण माहितीसह रहिवासीचे पुरावे सादर करावेत, दाखल केलेले अर्ज परीपूर्ण नसल्यास, अर्धवट असल्यास, रहिवासी पुरावे सादर केले नसल्यास ते विना कार्यवाही निकाली काढणेत येतील. त्यामुळे परिपूर्ण अर्ज व रहिवासी पुरावे दाखल करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ निकम यांनी केले आहे. शुक्रवारपर्यंत हरकत अर्ज स्वीकारण्यात येणार असून 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news