पिंपरी: मेट्रोचा प्रवास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना भावतोय. त्यामुळे दररोज दीड ते दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. प्रवाशांची गैरसुविधा होऊ नये म्हणून सर्व मेट्रो स्थानकांवर लाखों रुपये खर्च करून स्वयंचलित तिकीट मशिन बसविण्यात आले आहे; मात्र अनेकदा या मशिन बिघाडामुळे कागदी तिकीट मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने, मेट्रो प्रशासनाने कागदी तिकिटाला कात्री लावण्याचे ठरवले असून, मोबाईल, व्हॉट्स ॲप अथवा ॲपवररून डिजिटल तिकीट घेण्याविषयी प्रवाशांना सांगितले जात आहे.
कागदी तिकिटे बंद करून पूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीकडे वळण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
डिजिटल पर्यायांवर भर:
मेट्रो प्रशासनाने ‘व्हॉट्ॲप तिकीट’, ‘मेट्रो स्मार्ट कार्ड’ आणि ‘मोबाईल ॲप’ यांसारख्या पर्यायांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कागदाचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पाऊल उचलणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी अशी स्थानके आहेत. त्यापुढे स्वारगेट तसेच वनाज व रामावाडीपर्यंत मेट्रोने ये-जा केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नोकरदारांना कामानिमित्त पुणे शहरात जावे लागते. त्यामुळे मेट्रो प्रवासाला प्रवाशांची गर्दी होते. मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट खिडकीवर होणारी गर्दी. तिकीट मिळण्यास लागणारा वेळ व परिणामी निश्चितस्थळी प्रवाशांना पोहचण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने सर्व मेट्रो स्थानकांवर तीनपेक्षा आधिक स्वयंचलित व्हेडिंग मशीन बसविली आहेत.
अनेकवेळा मशीनमध्ये विविध बिघाड निर्माण होत असल्याने प्रवाशांना व्यवहार करताना ओटीपी न येणे, टच स्क्रीन काम न करणे, कागदी तिकीट मिळण्यास अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या येत होत्या. तसेच ऑनलाइन तिकीट मशीन मोबाइलवरुन स्कॅनिंग करताना वेळ लागत असल्यामुळे, प्रवासी व्हेंडिंग मशिनचा वापर करतात. कारण कागदी तिकीट स्कॅनिंगसाठी सोयीची होते. त्यामुळे मशीनचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो प्रशासनाने व्हॉट्स ॲपद्वारे डिजिटली तिकीट घेण्याविषयी सांगितले जात आहे. याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोरेशन कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देतात. ऑनलाइन तिकिटाची सक्ती केली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
तिकीट खिडकी बंद:
मेट्रो प्रवासात कागदी तिकिटाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना कागदी तिकीट हवे आहे. अशा नागरिकांना खिडकीवर मिळेल असे सांगितले जाते; परंतु तिकीट खिडकीबंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या गोष्टीचा त्रास जेष्ठांना आधिक होताना दिसत आहे.
डिजिटलला ग्रहण:
नोकरदार, महाविघालयीन विद्यार्थी यांच्याकडून मेट्रोच्या डिजिटल कार्डचा सार्वधिक वापर केला जातो. मात्र, कार्डला विविध समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांकडून कार्डसंर्दभात विविध तक्रारी केल्या जात आहे. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले आहे.
मेट्रो प्रवासात सार्वधिक डिजिटलचा वापर केला जातो. तसेच दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहार वाढला असल्याने जे प्रवासी ऑफलाइन व्यवहार करतात. त्यांनी देखील ऑनलाइन व्यवहार करावा जेणेकरून डिजिटल तिकीट मिळवताना कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, पुणे मेट्रो