Pimpri Chinchwad Husband Wife Candidates: पिंपरी-चिंचवड निवडणूक; एकाच प्रभागात पती-पत्नी आमनेसामने, राजकीय नाट्य रंगात

माघारीवरून वाद, घटस्फोटापर्यंत पोहोचले प्रकरण; मतदारांसाठी मात्र फायदेशीर ठरतेय लढत
Husband Wife Candidates
Husband Wife CandidatesPudhari
Published on
Updated on

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून पती व पत्नी, नातेगोते, एकाच कुटुंबातील सदस्य उतरले आहेत. एका प्रभागात अपक्ष म्हणून पती व पत्नी हे दोघेही उमेदवार रिंगणात आहेत. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करत असल्याने मतदारांशी दांडगा संपर्क असून, भरघोस मते मिळतील, असा दांडगा विश्वास त्या जोडप्यास आहे.

Husband Wife Candidates
Pimpri Chinchwad Municipal Election Wards: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; ३२ प्रभागांतील लढतीचे चित्र स्पष्ट

दोघे जण रिंगणात असल्याने मतांची विभागणी होईल, म्हणून त्यांच्यात दररोज वाद होत आहे. एकाने माघार घेतल्यास अधिक मते मिळतील, असा त्या दोघांचा दावा आहे. माघार कोणी घ्यावी, यावरुन दोघांमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. कुटुंबातील ज्येष्ठांपर्यंत हा वाद पोहचला आहे. त्यांनीही दोघांच्या भानगडीत पडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Husband Wife Candidates
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा निर्णायक

माघार घेण्यास कोणीच तयार नसल्याने प्रचार कसा करायचा यावरून त्यांचे एक मत होताना दिसत नाही. त्यावरून वाद आखणी चिघळला आहे. अखेर, घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊन पोहचले आहे.

Husband Wife Candidates
Chakan Market Yard Prices: चाकण मार्केट यार्डात कांदा-बटाट्याची मोठी आवक; पालेभाज्यांचे दर घसरले

निवडणूक आणि उमेदवारी माघारीचे हे नाट्य प्रत्यक्षात कोणत्या वळणार पोहणार, कोणाला किती मते मिळतात, यावर प्रभागातील नागरिकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांमधील वादाचा मतदारांना फायदा होत आहे.

Husband Wife Candidates
PCMC election counting preparation: महापालिकेकडून मतमोजणीची जोरदार तयारी

त्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी तसेच, मतदारांना खुश करण्यासाठी खर्चाचा सपाटा सुरू आहे. प्रचाराच्या 14 तारखेपर्यंत घ्या मजा करून, असा त्या काही नागरिकांचा कल दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news