Pimpri Prabhag 26 BJP Campaign Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Prabhag 26 BJP Campaign: प्रभाग २६ मध्ये भाजपाच्या पॅनेलच्या विजयाची नांदी; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पदयात्रा व सोसायटी भेटीतून नागरिकांचा वाढता विश्वास, कमळ ताकदीने फुलणार संकेत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, प्रचार फेऱ्यांची लगबग आणि पदयात्रेतील नागरिकांचा सहभाग बरेच काही सांगून जातो. प्रभागातील नागरिक उस्फुर्तपणे प्रचार रॅलीमध्ये सहभागी तर होत आहेतच; परंतु आपल्या सहभागाबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रियाही खूप बोलक्या असल्याचे दिसत आहे.

या प्रतिक्रियेवरून प्रभाग 26 मधील या पॅनेलच्या विजयाची नांदी घुमत असल्याचे पहायला मिळत आहे. प्रभाग क्र.26 मधील विशालनगर परिसरात ओवळ स्प्रिंग, अक्षयनगर फेज-1, एपिक सोसायटी, फ्रीडम पार्क, निकोस्काय सोसायटी, अशोक हेरिटेज, ओंकार रेसिडेन्सी तसेच श्वेतांगण श्री मंगलमूर्ती सोसायटी या सर्व सोसायट्यांना भेट देत सोसायटीमधील मतदार बंधू-भगिनींशी उमेदवारांनी आपुलकीने संवाद साधला.

यावेळी ॲड. विनायक गायकवाड, आरती सुरेश चौंधे, स्नेहा रणजित कलाटे व संदीप अरूण कस्पटे सर्व उमेदवार उपस्थित होते. या भेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या, सूचना व अपेक्षा काळजीपूर्वक जाणून घेतल्या; तसेच त्यावर सकारात्मक आणि ठोस तोडगा काढण्याचा विश्वासही दिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात राज्यातील लाडक्या बहीणींचे लाडके भाऊ देवाभाऊ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांना भरीव गती मिळाली आहे. पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सर्वसमावेशक विकास यावर ठोस भर देत ‌‘सबका साथ,सबका विकास‌’ या जयघोषाने प्रत्येक समाजघटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा भाजपाचा सातत्याने ठोस प्रयत्न आहे.

नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ही विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी कटीबध्द होणे गरजेचे आहे. प्रभागातील नागरिकांच्या प्रतिसादाने तथा सहकार्याने भाजपाचे कमळ ताकदीने फुलवणार हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT