Power Cut Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Power Outage Crane Incident: तळवड्यात क्रेन रोहित्रावर कोसळली; 8,600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

देहूगाव-तळवडे परिसरात उद्योगांना मोठा फटका; उकाड्यात नागरिक हैराण, क्रेनमालकाविरुद्ध तक्रार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरांत मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याने नागरिक व व्यावसायिक त्रस्त आहेत. त्यात तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळल्याने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन तळवडे, देहूगाव परिसरातील बहुतांश व्यावसायिक व घरगुती वापर करणाऱ्या ग््रााहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

गुरुवारी सकाळी ही क्रेन 22 केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या वाहिनीवर पडल्याने साधारण 8 हजार 610 ग््रााहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे. 22 केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनमधून देहूगाव व तळवडे या 22 केव्ही वाहिन्या बाहेर पडतात. या वाहिनीवर 1 हजार 910 औद्योगिक आणि 6 हजार 700 घरगुती ग््रााहक आहेत. या सर्वांना या बिघाडाचा फटका बसला आहे. क्रेनने एक रोहित्र व काही खांब जमीनदोस्त केले आहे. महावितरणचे कर्मचारी सकाळपासून येथील वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, रात्री आठ वाजतादेखील काम सुरू असल्याने नागरिकांना वीजपुरवठ्याविना राहण्याची वेळ आली. ळवडे, देहूगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान मोठे व्यावसायिक आहेत. त्यात कोल्डड्रिंक, दूध डेअरी, केक शॉपी, मेडिकल आदी व्यावसायिकांना वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे एका चुकीने आज या भागातील नागरिकांसह व्यावसायिक व उद्योजक यांना मोठा फटका बसला आहे.

लघुउद्योगांचे मोठे नुकसान

तळवडे परिसरात सूक्ष्म व लघु उद्योग तसेच मोठ्या कंपन्यांना विविध लहान मोठे पार्ट तयार करून पुरविणारे छोटे मोठे उद्योग व कंपन्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक या परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु, गुरुवारी अचानक क्रेन रोहित्रावर पडल्याने रोहित्रास वीजवाहिनी खांबांचे व तारा तुटण्याचा प्रकार घडल्याने आज सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत अनेक उद्योजकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. यामुळे उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा तळवडे परिसरात सुरू आहे.

क्रेनमालकाविरुद्ध तक्रार

अवजड वस्तू घेऊन जाणारा क्रेन गुरुवारी अचानक रोहित्रावर कोसळल्याने तळवडे व देहूगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच उद्योजक व नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महावितरणने संबंधित क्रेनमालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

उकाड्याने नागरिक हैराण

सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली आहे. घरात फॅन लावून बसले तरी बसू वाटत नाही. त्यात आज तळवडे आणि देहूगाव परिसरातील नागरिकांना विना लाईटचा आज दिवस रात्रीचा काही वेळ काढावा लागला. यामुळे उकाड्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी नागरिकांना घरात बसून राहणे कठीण झाले.

सकाळी साडेअकराच्या सुमारास अवजड वस्तू घेऊन क्रेन तळवडे येथील ज्योतिबा मंदिर परिसरातून जात असताना बाजूच्या रोहित्र व वीजवाहिनीवर कोसळले. तेव्हा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक घाबरले. सर्व परिसरातील वीजपुरवठा क्षणात खंडित झाला. परंतु वीजवाहिनी, विद्युत खांब तुटून पडल्याने आज दिवसभर व रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळित करण्यात महावितरणला यश आले नाही. यामुळे भर उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा घटना परत घडू नयेत, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
नरेंद्र अगरवाल, स्थानिक नागरिक
तळवडे येथे क्रेन रोहित्रावर कोसळल्याने देहूगाव व तळवडे परिसरातील उद्योजक व घरगुती ग््रााहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे कर्मचारी सकाळपासून वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी काम करत आहेत. रात्री आठनंतर वीजपुरवठा सुरळित होईल.
महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT