पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली. संबंधित पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई बावधन तर दुसरी कारवाई बालेवाडी येथे करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये चार महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस शिपाई उमेश खाडे आणि सचिन मोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तिसरी कारवाई काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस शिपाई गणेश कारोटे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जगताप डेअरी चौक ते शिवार गार्डन चौक यादरम्यान ही कारवाई केली असून, दोन महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिन्ही घटनांमध्ये आरोपी महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून आणि शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करताना आढळल्याने सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.