Election Result Celebration Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Municipal Election Result Celebration: पिंपरीत निकालानंतर जल्लोष; शहरभर पोलिस बंदोबस्त

विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, आतिषबाजी अन् गुलालाची उधळण; चौकाचौकात कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: सार्वत्रिक महापालिका निकालाची प्रतीक्षा संपताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला. त्यानंतर आपल्या प्रभागात जावून आतिषबाजी, गुलाल उधळून मिरवणूक काढली. महिला कार्यकर्त्यांनी एकमेंकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. चौकाचौकात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिवरणुकीत ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. दुसरीकडे, राष्ट्रवादीसह व अन्य पक्षातील पक्ष कार्यालय व संपर्क कार्यालयात शांतता होती.

महापालिकेच्या वतीने शहरात 8 क्षेत्रीय कार्यालयात विविध ठिकाणी मतमोजणी झाली. प्रत्यक्षात सकाळी दहा वाजता मोजणी सुरु होणे अपेक्षित असताना, उशिरा सुरु झाल्याने उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गोंधळले होते. पहिल्या फेरीत टपाली मतदान सुरु झाले. मात्र, त्यानंतर मतदानाच्या ईव्हीएमनुसार जसा कल कळत गेला, तसतसा कार्यकर्त्यांचा जल्ल्लोष वाढत होता.

कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारीनुसार कार्यकर्त्यांनी गणिते मांडली. तर, दुपारी दोन वाजल्यानंतर उमेदवारांच्या विजयाचा कौल लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल, भंडाीऱ्याची उधळण केली. कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली.

दरम्यान, केंद्राच्या परिसरात घुसरखोरी करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी मज्जाव केला. विजयी आकडाच्या जवळ आल्यानंतर उमेदवारांनी देखील बाहेर येवून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला. त्यातच तेथेच विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते असल्याने काही काळ तणावाचे वातवारण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केले.

चौकाचौकात बंदोबस्त

निवडणुकाच्या निकालानंतर पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकात बंदोबस्त नेमला होता. त्यात पक्षाचे जनसंपर्क कार्यालये, पक्षाचे मुख्य कार्यालये आणि विरोधी उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीजे मोठया आवाजाचे स्पीकर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बंद करायला लावले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT