

पिंपरी: निवडणुकीत यंदा या तीन प्रभागांतून पती व पत्नी असे जोडपे रिंगणात होते. निगडी, यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मधील दोन गटामधून मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे मैदानात होते.
मात्र, दोघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रावेत, मामुर्डी, किवळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे हे दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मात्र, त्या जोडप्याच्या पदरी पराभव आला आहे. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे हे विजयी झाले. मात्र, त्यांच्या माजी नगरसेविका शीतल काटे या पराजित झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात एकही जोडप्यांने प्रवेश केलेला नाही.