पिंपरी: पिंपरी फळ बाजारात पंजाबमधील किनू संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून 100 रूपये ला 2 किलो दराने उपलब्ध आहे.
इतर फळांचे दर नेहमीसारखे स्थिर आहेत. केळी 50 - 60 रूपये डझन दराने उपलब्ध आहेत तर डाळींब 260 रूपये किलो दराने उपलब्ध आहेत. ड्रॅगनफुट 100 - 150 रूपये किलो, पपई 60 रूपये किलो दराने आहेत.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे
नागपूर संत्री 150 ते 200 रूपये, चिकू 80 रूपये, सफरचंद 120 - 160 रूपये तर मोसंबी 100 - 180, डाळिंब 260 रूपये, पेरू 100 रूपये दीड किलो, पपई 60 - 70 रूपये, केळी 50 - 60 रूपये डझन, पिअर 140 रूपये, ड्रॅगनफुट पांढरे 100 रूपये दीड किलो, किवी 120, नाश्पती 120 रूपये, आलुबुखार 150 रूपये, अननस 100 रूपये, अंजीर 100 रूपये, बोर 50 रूपये, स्टॉबेरी 100 रूपये.