Ajit Pawar: घरी जाऊन बायकोला love you बोला, ती म्हणेल गडी लईच....; भर सभेत अजितदादांचा भन्नाट रिप्लाय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याला भर भाषणात दिला रिप्लाय.... सभेत हास्याचे फवारे
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on
Updated on

Municipal Corporation Election | सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणूकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सर्वच पक्षांनी विविध शहरांमधील मनपावर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही पुणे व पिंपरी चिंचवडवर लक्ष केंद्रीत केले आहे. आज पिंपरी चिचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दादांची प्रचारसभा सुरु असताना भाषणावेळी मजेशीर किस्सा घडला.  

अजित पवार यांचे भाषण थेट व तडक असते. ते ज्या त्‍यावेळी हजरजबाबी पद्धतीने उत्तर देत असतात. आता येथे भाषणावेळी एक कार्यकर्ता अचानकच दादांना ‘लव यू दादा’ असे मोठ्याने म्हणाला. याला तत्‍काळ प्रतिसाद देत दादांनी त्‍याला उत्तर दिले ‘घड्याळाच बटण दाब ते लव्ह यू राहूदे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण आय लव्ह यू... बायको म्हणेल गडी आज लयचं बिघडलाय.....!’ अशी टोले बाजी केली. पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढत आहे याठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये दादांची प्रचार सभा सुर होती. यावेळी हा किस्सा घडला.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP Manifesto: अजित पवार गट राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा जाहीर

भर सभेत हास्याचा फवारा

पिंपरी चिंचवडच्या मागील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल अजित पवार करत होते यावेळी एक चिठ्ठी त्‍यांच्याकडे आली. त्‍यावेळी त्‍यांनी काही सेकंद भाषण थांबवून चिठ्ठी पाहू लागले. एवढ्या शांततेचा फायदा घेत तो उत्‍साही कार्यकर्ता मोठ्याने म्हणाला ‘अजित दादा वी लव्ह यू’ हे उपस्थित सर्वांनाच ऐकू गेले त्‍यामुळे सभास्थळी अनेकांना हसू आले.

दादांचा हजरजबाबीपणा

त्‍यावर तात्‍काळ दादांनी त्‍याला थेट म्हटले ‘घड्याळाचे बटण दाबं... लव्ह यू बाजूला ठेव .... love you, love you, love you घरी जावून बायकोला म्हण... म्हणजे ती म्हणेल गडी आज लयचं बिघडलाय.. असे दादा म्हणले व त्‍यांनांही हसू आवरले नाही. पण दादांचा हा हजरजबाबीपणा पाहून कार्यकर्तेही चांगलेच हसू लागले.

दरम्यान ही प्रचारसभा भोसरी येथे पार पडली सभेच्या सुरवातीलाच दादांनी निवेदकाला थांबवत भाषणास सुरवात केली. प्रभाग दोनमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली. पिंपरी चिंचवड शहराने मला घडवले आहे अशी कबूली त्‍यांनी दिली तसेच या शहरामुळे मला लोकसभेत पोहचता आले. शेती करत असताना मला अचानक लोकसभेची उमेदवारी मिळाली, बारामती मतदारसंघात त्‍यावेळी हे शहर होते त्‍यामुळे मला कोणतेही काम न करतां व नवखा असूनही लोकसभेत पाठवले याबद्दल त्‍यानी आभार व्यक्त केले. तसेच शरद पवार यांचेही त्‍यावेळी संधी दिली याबद्दल आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news