Fake MLA Sticker Vehicles Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Fake MLA Sticker Vehicles: पिंपरीत आमदार स्टिकर लावून गाड्यांचा धिंगाणा; आरटीओ नियमांना पायदळी तुडवले

खोट्या ‘विधानसभा सदस्य’ स्टिकरचा वाढता गैरवापर; काळी काच, स्टाईल नंबर प्लेटसह वाहनांवर कारवाईची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: काळी काच, त्यावर गोलाकृत राज्याच्या विधानसभेचे स्टिकर त्यामध्ये अशोक स्तंभ, स्टाईलमध्ये लावलेली नंबर प्लेट जणूकाही आमदारांचे वाहन असल्याचे भासवण्याचा प्रयास शहरातील बहुतांश वाहनचालक, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. विधानसभा सदस्याचा स्टीकर लावून पिंपरी शहर, उपनगरात रुबाब, दाखवण्यासाठी आरटीओचे नियम मोडीत काढून गाड्या फिरवत असल्याचे दिसून येत आहेत; परंतु याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्याने अशा वाहनचालकांचा सुळसुळाट शहरात वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून वाहतुकीचे सर्व नियमांना तिलांजली देत काही चारचाकी वाहने वाहतूक पोलिसांच्या नजरा चुकवत रुबाबात फिरत असताना दिसतात. चारचाकी वाहनावर एक गोलाकार स्टिकर, त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे लिहिलेले आमदारांचे वाहन नसताना विधानसभा सदस्याचा स्टिकर लावून पिंपरी शहर, उपनगरांत रुबाबात वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

गाडीत आमदार असल्यासारखा रुबाब त्या गाडीचा असतो. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांचे पालन त्या वाहनचालकांडून होत नाही. ही वाहने पिंपरी शहरांतील विविध ठिकाणी सतत फिरताना दिसतात. गाडीत खरंच आमदारसाहेब आहेत की नाही, हे पोलिसांना पडलेली भूरळ असते. परंतु पिंपरी शहरातील परिसरात मात्र त्या गाडीची चर्चा होती तरी या स्टिकरमुळे आरटीओच्या नियमांचे पालन केले जात नाही.

स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

मागील काही दिवसांपासून पिंपरी शहर, उपनगरात खराळवाडी, पिंपरी, चिंचवड, नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा वास्तूउद्योग, पिंपरीगाव, डिलक्स चौक, शगुन चौक या परिसरामध्ये वाहतुकीचे सर्व नियम मोडून काही चारचाकी वाहनांवर विधानसभा सदस्याचा खोटा स्टीकर लावून गाडी फिरत आहे. या वाहनावर एक गोलाकार स्टिकर यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून येते . पोलिसांना संशय आल्यानंतर अशा वाहनांचा पाठलाग देखील केला जातो; परंतु ती वाहने मिळून येत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काळी काच, स्टाईलमध्ये नंबर प्लेट बसवलेले चारचाकी वाहने सर्रासपणे शहरात नियम धाब्यावर बसवून फिरत असताना आढळून आल्यास आमच्या स्कॉडकडून अशा वाहनांवर कारवाई केले जाते. तरी असे वाहने रस्त्यावर सुसाट वेगाने धावताना आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. अशा सूचना आमच्या स्कॉडला दिलेल्या आहेत. तरी येत्या काही दिवसांत अशा वाहनांवर लवकरच कारवाई करण्यात येईल.
आनंद मेश्राम, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT