Diwali Lighting Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Diwali Lighting: दिवाळीसाठी पिंपरीच्या बाजारपेठा रोषणाईने उजळल्या; दिया कर्टन, सोलर लाइटिंगला मागणी

१०० रुपयांपासून लायटिंगच्या माळा उपलब्ध; थ्रेड बॉल, मेटल डिझायनर लाइट्स आणि एलईडी तोरणांचे नवे ट्रेंड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिवाळी सणाला काही दिवसांचा अवधी शिल्लक असून, खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची आरास, लायटिंगचा झगमगाट. विविध प्रकारच्या दिव्यांनी घर सजविण्यासाठी लायटिंगच्या माळांना मोठी मागणी असते. यावर्षी बाजारात पारंपरिक झिरमिळ्यांबरोबर आधुनिक आणि पर्यावरणपूरक डिझाईन्स देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन आणि भोसरीच्या इलेक्ट्रिक बाजारात दिव्यांच्या माळांचा झगमगाट दिसून येत असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

यंदाच्या दिवाळीत सर्वांत जास्त ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे दिया कर्टन लाइट. या माळेमध्ये एका मुख्य लाईनला १२ लटकणारे दिव्याच्या आकाराचे एलईडी असतात आणि एकूण १०८ लाईट लागतात. भिंतीवर लावल्यानंतर खरे दिवे लावल्यासारखा भास होतो. यात ८ प्रकारचे मोड आहेत. दुसरा मोठा ट्रेंड आहे सोलर लाइटिंगचा. या माळेला विजेची गरज नाही. दिवसा सोलर पॅनेल चार्ज होते आणि संध्याकाळी आपोआप लाइट लागते. १२ मीटर लांबीच्या माळेत १२० एलईडी असतात आणि ती वॉटरप्रूफ असल्याने पावसातही खराब होत नाही. पर्यावरणप्रेमी ग्राहक याला पसंती देत आहेत.

याशिवाय बाजारात अनेक नवीन प्रकार आले आहेत. पानांच्या आकाराची लीफ लाइट, गुलाबाच्या फुलांची रोझ लाइट, क्रिस्टल बॉल कर्टन आणि स्टार कर्टन लाइट यांना तरुणींमध्ये जास्त मागणी आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वॉटर सेन्सर दिया आला आहे. हा दिवा पाण्यात टाकताच पेटतो, यात तेल लागत नाही. दिवाळीला विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा, लाइटची कृत्रिम फुले, लाइटच्या समई, एलईडी बसविलेली तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लाईटसच्या प्रकारांमध्ये यंदा वैविध्य पाहायला मिळते. यात रंगीबेरंगी थ्रेड बॉल, मेटलचे वेगवेगळ्या आकारांतील लाईटस बाजारात दाखल झाले आहेत. याच्या किंमती साधारण २५० रुपयांपासून सुरु आहेत.

थ्रेड बॉल प्रकारांत रंगांचे वेगळेपण असल्याने यांना चांगली मागणी आहे. तर मेटलच्या डिझायनर लायटिंगमध्ये स्टार, गोलाकार, बदाम असे आकर्षक आकार पाहायला मिळत आहेत. या सोनेरी आकारातील मेटल लाईट यंदा भाव खाऊन जात आहेत. लायटिंग माळा १०० ते १२५ रुपयांपासून उपलब्ध आहेत. बॉटलमधील लायटिंगची माळ हा वेगळा प्रकार बाजारात विक्रीस पहायला मिळत आहे. तसेच झुंबर व लाईटच्या समईसारखे प्रकार देखील लक्षवेधी ठरत आहेत. संपूर्ण घर किवा दुकाने, कार्यालये यांना लायटिंग करण्यासाठी ५० फुट, १०० फुट लांबीच्या माळा उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे पण कमीतकमी वीज घेणारे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

लाईटचे झुंबर आणि पाण्यातील कारंजे

दिवाळीसाठी खास प्रकारचे लाईटचे झुंबर आणि पाण्यातील कारंजे देखील पहायला मिळत आहे. यामध्ये छोट्या आणि मोठ्या आकारातील कारंजे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. पाणी आणि रंगबेरंगी लाईट्स असल्याने हे कारंजे अधिकच आकर्षक दिसतात.

लाईटचे तोरण

मोठ मोठ्या घरांसाठी, दुकानांसाठी, कंपन्यांसाठी मोठ्या आकारातील लाईट्सच्या तोरणाप्रमाणे दिसणार्‍या माळा देखील उपलब्ध आहेत. ४० ते ५० फुट लांबीच्या माळांनी संपूर्ण वास्तूंमध्ये झगमगाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT