Gas Booking Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Gas Booking Cyber Fraud: गॅस बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक; पिंपरीत नागरिकांना इशारा

बनावट लिंक आणि APK फाईलद्वारे मोबाईल हॅक; काही मिनिटांत खात्यातील रक्कम गायब, सायबर पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: अमेरिका- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस व डिझेलच्या संभाव्य टंचाईची चर्चा सुरू असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी नागरिकांना गंडा घालण्याचा नवा डाव आखला आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर ग््रााहकांच्या मोबाईलवर कन्फर्मेशनच्या नावाखाली संशयास्पद लिंक किंवा अझघ फाईल पाठवली जात आहे. या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये घातक सॉफ्टवेअर सक्रिय होऊन बँक खात्यांमधील रक्कम काही मिनिटांत गायब होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्याकडे मागील काही दिवसांत अशा प्रकारच्या 5 ते 6 तक्रारी नोंद झाल्या असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

घाईगडबड अंगलट

या सायबर फसवणुकीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकांची घाई आणि भीती. गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा पसरवून तुमचे बुकिंग तात्काळ कन्फर्म करा, सब्सिडी अपडेट करा, डिलिव्हरी व्हेरिफाय करा, अशा आशयाचे संदेश पाठवले जातात. या संदेशांमध्ये दिलेली अझघ फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच ती मालवेअरप्रमाणे कार्य करते. परिणामी मोबाईलमधील जढझ, पासवर्ड, बँकिंग ॲप्समधील माहिती आणि वैयक्तिक डेटा थेट सायबर गुन्हेगारांच्या हाती लागतो. त्यानंतर काही मिनिटांतच संबंधित खात्यातील रक्कम वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे काढली जाते.

हुबेहूब इंटरफेसमुळे विश्वास बसतो

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी बनावट वेबसाईट किंवा ॲप तयार करताना अधिकृत गॅस कंपन्यांचे लोगो, रंगसंगती आणि इंटरफेस हुबेहूब वापरतात. त्यामुळे ही सेवा अधिकृत असल्याचा भास निर्माण होतो. अनेक प्रकरणांमध्ये लिंक उघडताच मोबाईलवरील ॲप्स, कॉल आणि मेसेजेसवरही नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे वापरकर्त्याला काही काळ फसवणूक झाल्याची कल्पनाही येत नाही. या संपूर्ण प्रक्रियेत तांत्रिक कौशल्याचा वापर करून अत्यंत कमी वेळात आर्थिक नुकसान केले जात आहे.

संशयास्पद गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे

सध्याच्या परिस्थितीत सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मनोवृत्तीचा आणि तंत्रज्ञानाच्या आधारे नवे सापळे रचत आहेत. त्यामुळे कोणतीही डिजिटल प्रक्रिया करताना पडताळणी करणे, अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणे आणि संशयास्पद गोष्टींपासून दूर राहणे, हेच फसवणूक टाळण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

सायबर गुन्हेगारांचा डेटा हंट कसा चालतो?

सायबर गुन्हेगार कोणालाही लक्ष्य करत नाहीत, तर आधी संबंधित व्यक्तीबद्दल माहिती गोळा करतात. सोशल मीडिया प्रोफाइल, ऑनलाईन शॉपिंग, मोबाईल ॲप्स, सार्वजनिक वेबसाईट्‌‍स यावरून नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवली जाते. कोणत्या सेवा वापरतात, कोणत्या कंपनीचे ग््रााहक आहेत, मोबाईल नंबर आणि ई-मेल यांचा डेटा एकत्र करून टार्गेट प्रोफाइल तयार केले जाते. यानंतर त्या व्यक्तीला विश्वास वाटेल, असा मेसेज किंवा कॉल केला जातो. त्यामुळे फसवणूक अधिक सहज घडते. तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन माहिती शेअर करताना मर्यादा पाळणे आणि गोपनीयता सेटिंग्स योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

...अशी घ्या खबरदारी

  • कोणतीही अनोळखी लिंक किंवा अझघ फाईल डाउनलोड करू नका

  • गॅस बुकिंगसाठी केवळ अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळाचा वापर करा

  • मोबाईलमध्ये ‌‘णपज्ञपुेप र्डेीीलशी‌’ पर्याय बंद ठेवा

  • जढझ, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका

  • संशयास्पद मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नका

  • बँकिंग व्यवहारांसाठी दोन-स्तरीय सुरक्षा (2 ऋअ) सक्षम ठेवा

  • मोबाईलमध्ये सुरक्षा ॲप किंवा अँटीव्हायरसचा वापर करा

  • प्रत्येक व्यवहाराचे डचड किंवा ॲप नोटिफिकेशन तपासत रहा

  • फसवणूक झाल्यास विलंब न लावता 1930 हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा

गॅस बुकिंगच्या नावाखाली अझघ फाईल किंवा लिंक पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अधिकृत कंपन्या अशा प्रकारे कोणतेही ॲप डाउनलोड करण्यास सांगत नाहीत. नागरिकांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
रविकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
गॅस बुकिंग केल्यानंतर काही वेळातच एक लिंक आली. ती कन्फर्मेशनसाठी असल्याचे वाटल्याने मी क्लिक केले. त्यानंतर मोबाईलमध्ये काही प्रक्रिया सुरू झाल्यासारखे दिसले. काही मिनिटांतच खात्यातून पैसे वळते झाल्याचे मेसेज येऊ लागले आणि बघता बघता सर्व रक्कम गायब झाली.
पीडित नागरिक, चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT