शहर स्वच्छतेत महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय ठसा! Pudhari
पिंपरी चिंचवड

Women Sanitation Workers Pimpri Chinchwad: शहर स्वच्छतेत महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय ठसा!

साडेचारशेहून अधिक महिला सफाई कर्मचाऱ्यांचे शहर स्वच्छतेसाठी योगदान, नागरिकांमध्ये घरोघरी जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचरा विलगीकरण, जनजागृती, आरआरआर प्रकल्प तसेच, शून्य कचरा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. साडेचारशेपेक्षा जास्त महिला दररोज शहर स्वच्छतेसाठी योगदान देत आहेत, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी बुधवारी (दि.25) सांगितले.(Latest Pimpari chinchwad News)

शहरात आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 32 प्रभागात स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यास प्राधान्य दिले जाते.

आरोग्य विभागातील संतोषी कदम, रश्मी तुंडलवार, स्नेहल सोनवणे, स्नेहल सुकटे, रुपाली साळवे, स्नेहा चांदणे, कोमल फर्डे व रुपाली शेटे या आरोग्य निरीक्षक नागरिकांमध्ये जनजागृती करून, त्यांना स्वच्छतेची सवय लावण्याचे काम करीत आहेत. दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कचरा संकलन, नालेसफाई, तसेच, स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना सहभागी करून घेण्याचे काम समर्थपणे सांभाळत आहेत. स्थानिकस्तरावर कचरा विलगीकरण जनजागृती व परिसरातील स्वच्छतेवर नियमित देखरेख त्या करतात. अनेकदा घरोघरी जनजागृती मोहिम राबवतात. शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगतात.

त्याबाबत आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे यांनी सांगितले की, संपूर्ण शहरात दररोज स्वच्छता ठेवणे हे आव्हानात्मक असते. पण नागरिकांचा पाठिंबा मिळाला की काम सोपे होते. स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग हा मोठा प्रेरणास्रोत आहे. आरोग्य निरीक्षक संतोषी कदम म्हणाल्या की, शहराची स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे. नागरिकांनी थोडी जबाबदारी घेतली, तर आपण मिळून शहर देशातील सर्वात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर शहर बनवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT