पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय समाज पार्टी या तीन पक्षांची युती झाली आहे. दोन्ही पक्ष मिळून शहरामध्ये 128 पैकी 88 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग््रेासने अंतिम टप्यात अजित पवारांशी आघाडी केल्यानंतर शिवसेनेने मनसेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. या युतीमध्ये शिवसेना 59 तर मनसे 17 आणि रासप 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि मनसेच्या वरिष्ठांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये शिवसेना 59 जागांवर लढणार आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून भाग्यश्री तरस, 17 मध्ये रवींद्र महाजन, ज्योती भालके आणि किरण दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग 18 मध्ये रफिया पानसरे, राहुल पालांडे, सचिन दोनगहू, प्रभाग 22 मध्ये सुजाता नखाते, गौरव नढे, प्रभाग 23 मधून सविता जाधव, कानिफनाथ केदारी यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग 25 मध्ये सागर ओव्हाळ, बेबी जाधव, चेतन पवार, 26 मधून मीरा कदम, प्रकाश बालवडकर यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रभाग 27 मधून वनिता नखाते, 28 मधून अनिता तुतारे, 29 मधून अनुसया सकट व 32 मधून ज्योती गायकवाड, रेश्मा शिंदे आणि वर्षा पोंगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 10 मधून रुपाली गायकवाड, 14 मधून निखिल दळवी, योगिता कांबळे, 19 मधून पूजा साबळे, ताहीर भालदार, 19 मधून आकाश चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून गौतम लहाने, नीलम म्हात्रे, संजना यादव, 21 मधून पूजा इंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमाकं 30 मधून गोपाळ मोरे, पार्वती खामकर, सुषमा गावडे आणि तुषार नवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 1 मधून विजय जरे, राहुलकुमार भोसले, प्रभाग 2 मधून कल्पना घंटे, मोहम्मद खान, प्रभाग 3 मधून रेखा ओव्हाळ, मनीषा बोराटे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश ठाकरे, कल्पना शेटे, दिलीप सावंत, 6 मधून संदीप पाळंदे, 8 मधून दत्ता शेटे, सरिता कुऱ्हाडे, 9 मधून सागर सूर्यवंशी, समरीन कुरेशी आणि गणेश जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. प्रभाग 11 मधून विश्वास गजरमल, मंगला सोनावणे, मोहर कोकाटे, काशिनाथ जगताप, प्रभाग 12 मधून अमोल भालेकर व प्रभाग 13 मधून रवींद्र खिलारे, संगीता पवार आणि सतीश मरळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.
मनसेचे 17 प्रभागात उमेदवार
मनसेने 128 पैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून जयसिंग भाट, 6 मधून निलेश सूर्यवंशी, 8 प्रतिक जिते, 10 गीता चव्हाण, कैलास दुर्गे, हर्षकुमार महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 13 पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले व माजी नगरसेविका अश्विनी चिखले, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, प्रभाग 15 मधून स्वाती दानवले, 16 अस्मिता माळी, 19 लता शिंदे , 21 राजू भालेराव, 17 तुकाराम शिंदे , 30 रेखा जम आणि प्रभाग क्रमांक 32 मधून राजू सावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.