

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख भाजपा पक्षासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 16 माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. त्या माजी नगरसेवकांना घरीच बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तब्बल 9 वर्षांनंतर महापालिकेची निवडणुकीत होत असल्याने सर्वच पक्षाच इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती. भाजपाकडे सर्वाधिक 730 इच्छुक होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 500 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. इतर पक्षांकडे 200 ते 300 इच्छुक होते. तर, भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करण्यात आली. इच्छुकांच्या गर्दीत आयारामामुळे आणखी गर्दी वाढली.
आरक्षण बदलल्याने तसेच, पक्षाला सक्षम उमेदवार मिळाल्याने भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने काही माजी नगरसेकांना उमेदवारी नाकारली आहे. इतके दिवस पक्षाचे काम केल्याने तसेच, मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याने ऐनवेळी पक्षाने तिकीट न दिल्याने त्यांच्यासह सर्थकांना धक्का बसला आहे. त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष व आमदारांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर, काही माजी नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात उडी घेत तेथून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या प्रभागातील चित्र तसेच, राजकीय समीकरणात बदल झाला आहे.
माजी नगरसेवकांना मिळाला नारळ
केशव घोळवे, शैलेश मोरे, प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, माधुरी कुलकर्णी, तानाजी गावडे, विक्रांत लांडे, गीता मंचरकर, अश्विनी वाघमारे, निर्मला कुटे, निर्मला गायकवाड, अश्विनी बोबडे, आशा शेंडगे, माधवी राजेंद्र राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे आदी. फेबुवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत एकूण 128 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर पक्षभेदामुळे तब्बल 31 माजी नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला आहे. पक्षबदलाचा हा प्रकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होता.
राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग््रा कदम यांनी भाजपात प्रवेश केला. शिवसेनेचा माजी नगरसेविका प्रमोद कुटे, अमित गावडे व मीनल यादव यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या माजी नगरसेविका कोमल मेवानी यांचे पती दीपक मेवानी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपाचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाचे करुणा चिंचवडे यांच्या पती शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या माजी महापौर अर्पणा डोके यांनी भाजपात प्रवेश केला. शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विनोद नढे यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. अपक्ष नीता पाडाळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपाचे वसंत बोराटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक समीर मासुळकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या रेखा दर्शले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपाचे माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाच्या प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका भिमाबाई फुगे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका उषा वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचे अंबरनाथ कांबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.